भात आणि चपाती या दोन्ही गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या जीवनात होत असतो. अनेकजण फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी कारण्यासाठगी डाएट करतात. अनेक नवीन फिटनेस फ्रिक लोकांना सर्वात जास्त सतावणारा प्रश्न म्हणजे आहारात चपाती खाणे जास्त फायदेशीर आहे की भात खाणे जास्त फायद्याचे आहे. बघायला गेलं तर दोन्हींमधून आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते.
भात हा जगातील सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अनेकांना तर जेवणात भात खाल्ल्या शिवाय त्यांचे पोट भरलेले वाटतच नाही. जेवणातली काय ती तृप्ती ती त्यांना भातातूनच मिळते. दुसरीकडे चपाती हा एक भारतीय पदार्थ असून हा मुख्यतः गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. अनेकदा इतर पिठांपासूनही चपात्या बनवल्या जाऊ शकतात. आता चपाती आणि भात यापैकी आरोग्यसाठी सर्वाधिक काय चांगले आहे ते पाहुयात.
[read_also content=”सकाळची सुरुवात चहाने नाही तर ब्लू टी ने करा, दिवस जाईल मस्त https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-drinking-blue-tea-538452.html”]
भात की चपाती काय आहे फायदेशीर?
दोन्हींमधले कॅलरीजचे प्रमाण पाहिले तर, चपाती आणि भातामध्ये सारख्याच प्रमाणात कॅलरीज असतात. पोषणतज्ञ्च्या मते, कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. चपाती आणि भात या दोन्हींमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जरी सारखे असले तरी पौष्टिक मूल्य भिन्न आहे कारण चपातीमध्ये तांदळापेक्षा जास्त प्रथिने आणि तंतू असतात.
तांदूळ आणि चपातीतील कार्ब्सबद्दल बोलायचे झाले तर तांदूळ पॉलिश करताना फायबर काढून टाकले जाते, यामुळे खराब कार्ब्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे जास्त भात खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र तांदळामध्ये असलेले अमाइलोपेक्टिन पचण्यास सोपे असते. चपाती ही हळूहळू पचते, ज्यामुळे मंद पचनामुळे तुम्हाला अधिक काळ भूक लागत नाही. भातापेक्षा चपातीमध्ये अधिक पोषकतत्वे आढळली जातात. चपातीत कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. प्रोटिन्सबद्दल बोलणे केले तर, दोन्हींनीमध्ये सामान प्रमाणात प्रोटिन्स आढळले जाते.
लक्षात घ्या:
भात आणि चपाती दोन्हीही आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. दोन्हींमधून ऊर्जा आणि पोषकतत्वे मिळतात. मात्र आहारातील चपात्यांची संख्या आणि भाताचे प्रमाण योग्य असणे फार गरजेचे आहे. अर्धा वाटी भात आणि चार चपात्या हे प्रमाण उत्तम आहे. तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ते जास्त खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






