रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या 'हा' पौष्टिक रस
चुकीचा आहार, कामाचा वाढलेला ताण, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल साचून राहण्यास सुरुवात होते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते तर वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगांचा चिकट थर जमा करतो. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. मात्र बरीच लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे अचानक रात्री झोपेत किंवा चालताना हार्ट अटॅक येतो.(फोटो सौजन्य – istock)
शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात ‘हे’ चविष्ट पदार्थ! कमी वयात हाडांमधून येऊ लागतो कटकट आवाज
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चिकट थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर विविध लक्षणे दिसून येतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयरोग, हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात विविध कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात आलेला लठ्ठपणा, सतत जंक फूडचे सेवन, व्यायाम न करणे, धुम्रपान, मद्यसेवन आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजारांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित ताज्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय रोजच्या आहारात नियमित पौष्टिक पदार्थाचं खावे.
वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा दुधी भोपळा, एक काकडी, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, लिंबाचा रस आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरमधून रस बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस गाळून नियमित उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. महिनाभरात शरीरात वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होईल.
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणजे काय?
जेव्हा LDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि HDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, तेव्हा त्याला उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणतात.
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कशामुळे वाढते?
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त चरबीयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे, तसेच शारीरिक हालचाली कमी करणे आणि धूम्रपान.
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी काय खावे?
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्ये, मासे आणि नट्स यांचे सेवन करावे. तसेच, संतृप्त चरबी (saturated fat) आणि ट्रान्स फॅट्स (trans fats) असलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे.