शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात 'हे' चविष्ट पदार्थ
निरोगी आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. शरीरातील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. कॅल्शियम, विटामिन सी किंवा विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हाडांमधून सतत येणारा कटकट आवाज, नख तुटणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडे ठिसूळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात चुकीच्या पदार्थांचे आणि जंक फूडचे सतत सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सतत सेवन केले जाणारे कोणते पदार्थ हाडांमधील कॅल्शियम नष्ट करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा पिण्याची सवय असते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाचे सेवन केल्यानंतर होते. पण नियमित भरपूर चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे. नियमित दोनदा किंवा तीनदाच चहाचे सेवन करावे. कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅसिड शरीरातील कॅल्शियम कायमचे नष्ट करून टाकते. तसेच शरीराला कॅल्शियम योग्य प्रकारे शोषता येत नाही. त्यामुळे सतत चहा किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नये.
रोजच्या आहारात अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे मधुमेहासारखी गंभीर परिस्थिती उद्भवते. साखरेमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात. केक, कुकीज, मिठाई यामध्ये प्रोसेस्ड शुगरचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. यामुळे हाडे आणि दात दोन्ही सुद्धा कमकुवत होऊन जातात.
जेवणामध्ये फक्त ५ ग्रॅम मिठाचा वापर करावा. यापेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यास शरीरात सोडियमची पातळी वाढते आणि पायांना सूज येण्याची शक्यता असते. मिठामध्ये असलेले सोडियम किडनीमार्फत कॅल्शियम शरीरातून बाहेर काढून टाकते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होण्यासोबतच विटामिन डी च्या मेटाबॉलिझमला आणि कॅल्शियम पोहचते.
कॅल्शियम म्हणजे काय?
कॅल्शियम (Calcium) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे, जे मानवी शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?
कमकुवत आणि ठिसूळ हाडे, फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढणे.स्नायू दुखणे, पेटके येणे.दातांमध्ये वेदना किंवा संवेदनशीलता.थकवा, चिडचिडेपणा, त्वचेच्या समस्या.
कॅल्शियमच्या गोळ्या कधी घ्याव्यात?
कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. सामान्यतः, त्या जेवणानंतर किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार घ्याव्यात.