कांदा लसुणचा वापर न करता भंडारा स्टाईलने बनवा काळ्या चण्यांची चविष्ट भाजी
रोजच्या डब्यात लहान मुलांना नेहमी नेहमी काय खायला द्यावं, असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. याशिवाय घरातील इतर सदस्यांच्या डब्यात नेमकी काय भाजी बनवावी? असे प्रश्न महिलांना सतत पडतात. नेहमीच हिरव्या पालेभाज्या किंवा फळ भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्याच इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भंडारा स्टाईलने काळ्या चण्यांची चविष्ट भाजी बनवू शकता. काळे चणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. काळ्या चण्यांची सुखी भाजी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्यांची चविष्ट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)