फोटो सौजन्य - Social Media
स्वयंपाकघरात झुरळे असणे ही सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. अनेक घरे या त्रासाला सामोरे जात आहेत. रासायनिक स्प्रे प्रभावी असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे अशा रसायनांना आपल्या घरापासून लांब ठेवणेच कधीही उत्तम! शिप्रा राय यांनी घरातील नैसर्गिक घटक वापरून झुरळांसाठी सुरक्षित द्रावण तयार करण्याची पद्धत सांगितली आहे.
द्रावणातील मुख्य घटक
सर्वात आधी कांदा बारीक चिरून झुरळांची हालचाल असलेल्या जागी ठेवा. त्यांनतर लसूण + लवंगा + काळी मिरी एकत्र वाटून पेस्ट तयार करा. मग पेस्ट चाळणी किंवा पातळ कापडातून गाळून खडबडीत कण वेगळे करा. गाळलेले द्रव स्प्रे बाटलीत भरा.
कुठे-कुठे फवारणी करावी?
फवारणी सिंकखालील ओलसर भागात करावी. गॅस स्टोव्हच्या मागील भिंतीवर फवारणी करावी. फ्रिजच्या मागील तळाचा भागात फवारणी करावी. किचन कॅबिनेटमधील कोपरे गटाराजवळील फटी, पाईप्सची जागा तसेच दरवाजे व खिडक्यांच्या कडा येथे साफ करा.
परिणाम आणि वापराची वारंवारता






