(फोटो सौजन्य – istock)
अनेकजण सांधे आणि हाडांच्या समस्येने ग्रस्त आहेत, हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. हाडांचा कमकुवतपणा तुमचे संपूर्ण शरीर वीक बनवतो. तुमचे शरीर सुरळीत काम करावे अशी तुमची इच्छा असेल तर यासाठी हाडांचे मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे. शरीराच्या योग्य कार्यासाठी तुमचे सांधे आणि हाडे निरोगी असायला हवेत. मजबूत आणि निरोगी हाडे मिळवायची असल्यास आपल्याला आपल्या आहारात काही विशिष्ट बदल करणे गरजेचे आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार हाडांना मजबूती देऊन गुडघेदुखी किंवा सांधेदुखीसारख्या समस्येपासूनही आपली सुटका करतो. ऋषिकेशमधील आयुर्वेद तज्ञ बाबा कैलाश यांनी हाडांच्या समस्या दूर करुन त्यांना मजबूती मिळवून देण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे.
काय आहे उपाय?
आयुर्वेद तज्ञ बाबा कैलाश यांच्या मते, काळे मनुके आणि पांढरे तीळ हाडांना आतून मजबूती मिळवून देण्यास मदत करतात. काळ्या मनुक्यात लोह, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स आणि हाडे आतून मजबूत करणारे विविध पोषक घटक आढळून येतात. काळे आणि पांढरे तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यांचे एकत्र सेवन केल्यास गुडघ्यातील लुब्रिकेशन वाढवण्यास आणि हाडांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
कृती:
बाबांनी स्पष्ट केले की, आठवड्यातून २-३ वेळा सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन करायचे आहे. तुम्ही जर याचे न चुकता रोज सेवन केले तर काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या हाडांच्या दुखण्यात फरक जाणवेल. यामुळे गुडघ्याची सूज आणि वेदना कमी होतात, सांधे कडक होण्याची समस्या दूर होते आणि हाडांना मजबूती मिळते.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर करा ‘या’ तेलाने मसाज, सकाळी उठल्यानंतर चेहरा दिसेल टवटवीत आणि फ्रेश
उपाय कोणासाठी फायदेशीर ठरतो?
बाबा कैलास म्हणाले की, ज्यांना गुडघ्यांमध्ये सतत वेदना होतात, उठताना किंवा बसताना आवाज येतो, ज्यांच्या गुडघ्यातील चरबी कमी झाली आहे, हाडांमध्ये कमकुवतपणा जाणवतो किंवा सकाळी उठताच ज्यांचे शरीर दुखू लागते अशा लोकांसाठी हा उपाय फायदेशीर आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






