आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सातत्याने खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. अनेकांना पोट साफ न होणे, जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा सतत गॅस होणे इत्यादी पोटासंबंधित समस्यांचा नेहमीच सामना करावा लागतो. शरीरात विषारी पदार्थ तसेच राहून राहिल्यानंतर आतड्याना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. अशावेळी तुम्ही आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करून पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर ओव्याचे सेवन करावे. किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओव्याचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि आराम मिळतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित ओव्याचे सेवन करावे. ओवा खाल्यामुळे पोट दुखीचा त्रास कमी होतो. गॅस, ऍसिडिटी कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया ओव्याचा वापर कशा पद्धतीने करावा.
एक चिमूटभर ओवा आणि गरम पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. गॅस, अपचन, आणि ब्लोटिंग इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भाजून घेतलेला ओवा काळ्या मीठासोबत खावा. यामुळे पोट दुखीचा त्रास कमी होऊन पचनक्रिया सुधारेल.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ओव्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.तुम्ही या चहाचे रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर सेवन करू शकता. चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात अर्धा चमचा ओवा टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर थंड करून किंवा गरम चहाचे तुम्ही सेवन करू शकता.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
ओव्याचा पानांचा वापर करून अनेक घरांमध्ये भजी बनवली जाते. तसेच पोट दुखी किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याची पाने कच्ची खाल्ली जातात. शिवाय या पानांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चपाती करताना तुम्ही पिठामध्ये ओव्याची पाने कुसकरून टाकू शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. ब्लोटिंगची समस्या उद्भवू लागल्यानंतर ओव्याचे सेवन करावे. यामुळे लवकर आराम मिळेल.