बुलढाण्यातील गावांमध्ये अनेकांना फंगल इन्फेक्शनची लागण
कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा नव्याने पसरलेल्या विषाणूमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही दिवसांपासून बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, घुई या गावांमध्ये पसरलेल्या विचित्र साथीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या साथीची लागण झालेल्या नागरिकांच्या डोक्यावरचे केस पूर्णपणे गळून जाऊन टक्कल पडले आहे. तसेच गावात टक्कल पडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली असून 51 वर पोहोचली आहे. 3 दिवसांमध्ये केस मुळासहीत हातामध्ये येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु असून त्वचारोग डॉक्टरांचे पथक गावात दाखल झाले आहे. फंगल इन्फेक्शन झाल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचे या पाण्याच्या तपासणीत उघड झाले आहे. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणे विष ठरतं आहे. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे धक्कादायक वात्सव समोर आल आहे.
केसांमध्ये तीन दिवसात टक्कल पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. केस गळून टक्कल पडणे, हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले आहे. दिवसेंदिवस टक्कल पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. विशेषतः यामध्ये लहान मुलं, महिलांसह अनेक पुरुषांसुद्धा या साथीची लागण झाली आहे. शॅम्पूचा वापर न करणाऱ्या लोकांना सुद्धा टक्कल पडत असल्यामुळे शेगावमधील पूर्णा नदीकाठच्या 15 गावात खळबळ मोठी खळबळ उडाली आहे.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
गावातील लोकांना विचित्र साथीची लागण झाल्यानंतर आधी डोक्याला खाज येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हळूहळू केस गळती होण्यास सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी मुळासहित केस हातामध्ये येऊन अनेकांच्या डोक्यात टक्कल पडले. पुरुषांच्या दाढीचे केससुद्धा गळू लागल्यामुळे गावात भीती निर्माण झाली आहे. मागील तीन दिवसांमध्ये गावातील अनेकनाच्या डोक्यावरचे केस गळून टक्कल पडल्यामुळे चर्मरोग तज्ज्ञांचे पथक गावात दाखल झाले आहेत. टक्कल पडलेल्या नागरिकांवर उपचार सुरु असून कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात नागरिकांची तपासणी सुरु आहे. गावातील पाणी, टक्कलबाधित नागरिकांच्या त्वचेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.