'या' भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी ठरेल विषासमान! हाडांमध्ये वाढेल Uric Acid
दैनंदिन आहारात रोज वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात कायमच जंक फूड, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण सतत चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे योग्य वेळी लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा लहान आजार मोठे आणि गंभीर स्वरूप घेतात. शरीरात सतत रासायनिक प्रक्रिया घडतात. ज्यामुळे काहीवेळा शरीराला ऊर्जा मिळते तर काहीवेळा शरीरात विषारी घटक तयार होतात. शरीरात तयार होणारे विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात आणि आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेले युरिक अॅसिड रक्तात तसेच साचून राहते, ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होणे, हाडे दुखणे, संधिवाताचा त्रास इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात युरिक अॅसिड साचून राहिल्यानंतर किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात प्युरिन असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढत जाते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. संधिवात किंवा हाडांच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या लोकांनी या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये.
दैनंदिन आहारात सगळ्यांचं पालेभाज्या खाण्याची सवय असते. पालेभाज्या शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि विटामिन सी आढळून येते. पण गाऊट किंवा संधिवाताच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी पालकची भाजी अजिबात खाऊ नये. यामुळे हाडांमध्ये प्युरीन साचून राहते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. याशिवाय कच्च्या आणि अर्धवट शिजलेल्या पालकचे सेवन केल्यामुळे शरीरात प्युरीन सक्रिय होतो.
मशरूममध्ये प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये प्युरीनचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते. आहारात नियमित मशरूमच्या भाजीचे सेवन केल्यास सांध्यांमधील वेदना वाढू लागतात. यामुळे संधिवात किंवा गाऊट होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा मशरूमच्या भाजीचे सेवन करावे.
महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन, कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मटार खायला खूप जास्त आवडतात.मटार पनीर, पावभाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवताना मटारचा वापर केला जातो. पण या भाजीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोन, गाऊट, सांधेदुखीची समस्या वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक घ्यावा.
युरिक अॅसिड म्हणजे काय?
युरिक अॅसिड शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे, जो प्युरिन नावाच्या घटकाचे विघटन झाल्यावर तयार होतो. सामान्यतः हे मूत्रपिंडांद्वारे फिल्टर होऊन लघवीतून बाहेर टाकले जाते.
युरिक अॅसिडची पातळी जास्त असल्यास काय होते?
रक्तातील जास्त युरिक अॅसिडमुळे क्रिस्टल्स तयार होऊ शकतात, ज्यामुळे गाउट (एक प्रकारचा संधिवात) किंवा किडनी स्टोन होऊ शकतो. याची जास्त पातळी उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मेटाबॉलिक सिंड्रोमशी देखील संबंधित आहे.
युरिक अॅसिडची पातळी जास्त असण्याची लक्षणे कोणती आहेत?
सांधेदुखी, सूज (विशेषतः मोठ्या पायाच्या अंगठ्यात) आणि कडकपणा ही उच्च युरिक अॅसिडची सामान्य लक्षणे आहेत.