(फोटो सौजन्य: istock)
दररोज स्वयंपाकघरात वापरला जाणारा कढीपत्ता अनेक पोषकघटकांनी भरलेला असतो. याच्या मदतीने फक्त पदार्थांची चव वाढवता येत नाही तर याचे सेवन आरोग्यालाही अनेक फायदे मिळवून देते. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. यात असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात, रक्त शुद्ध करतात आणि केस, त्वचा तसेच हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय
दक्षिण भारतात कढीपत्त्याच्या पानांना फार आरोग्यादायी मानलं जातं आणि हेच कारण आहे की, त्यांच्या प्रत्येक पदार्थांंमध्ये या पानांचा आवर्जून वापर केला जातो. कढीपत्त्यात १०० ग्रॅममध्ये तब्बल ८३० मिग्रॅ कॅल्शियम भरलेलं असत. याचाच अर्थ असा की याचे सेवन आपल्या शरीरातील हाडांना मजबूत करण्यास मदतनीस ठरतं. वजन कमी करण्यापासून ते शरीर डिटाॅक्स करण्यापर्यंत कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला अनेक फायदे होतात. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
तिळा-कढीपत्ता
कढीपत्त्यासोबत तिळाचे सेवन हाडांना मजबूत ठेवण्यासाठी फायद्याते ठरु शकते, कारण या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण आढळते. तुम्ही कढीपत्ता आणि तिळ एकत्र भाजून याची चटणी तयार करु शकता. ही चटणी चव आणि पोषण दोन्हींचा अप्रतिम समतोल राखेल. हिवाळ्यात रोजच्या आहारात या चटणीचे सेवन हाडांची ठसुळता कमी करण्यास मदत करते. विशेषत: महिलांसाठी याचे सेवन कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास आणखीन फायद्याचे ठरेल.
नाचणीसोबत कढीपत्ता
नाचणीचे सेवन आरोग्यासाठी फार पूर्वीपासून हेल्दी मानले जाते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये जवळपास ३४४ मिग्रॅ कॅल्शियमचे प्रमाण आढळते. नाचणीपासून तुम्ही डोसा, भाकरी असे अनेक पदार्थ बनवू शकता. या पिठात तुम्ही कढीपत्ता मिक्स करु शकता, यामुळे हाडांना मजबूती मिळण्यासोबतच तोंडाला चवही मिळेल. आपल्या रोजच्या जेवणात तुम्ही याचा समावेश करु शकता.
पनीरसोबत कढीपत्ता
अनेक व्हेड लव्हर्सच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर. तुम्हाला माहिती आहे का? पनीर देखील हाडांना मजबूती मिळवण्यासाठी फार उपयोगी पडणारा पदार्थ आहे. ०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे २०० ते २५० मिग्रॅ कॅल्शियमचं प्रमाण आढळतं. तुम्ही पनीरपासून पनीर भूर्जी, पनीर टिक्का आणि पनीर पराठा असे अनेक पदार्थ तयार करु शकता. पनीरमध्ये प्रथिने आणि खनिजे दोन्ही मुबलक प्रमाणात आढळते. हे हाडांसाठी एका टाॅनिकप्रमाणे काम करते.
बदामासोबत कढीपत्ता
हाडांना मजबूत करण्यात बदामाचे सेवन देखील फायद्याचे ठरते. यामध्ये १०० ग्रॅममध्ये जवळपास २६० मिग्रॅ कॅल्शियम आढळते. यात हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतात. कढीपत्त्याच्या पानांबरोबर बदाम वाटून चटणी तयार केली जाऊ शकते जिला तुम्ही सलाडवर टाकून खाऊ शकता. बदाम आणि कढीपत्त्याचे हे मिश्रण शरीराला ऊर्जा मिळवून देते आणि हाडांची घनता वाढवते. सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी याचे सेवन फायद्याचे ठरेल.
शेवग्याच्या पानांसोबत कढीपत्ता
१०० ग्रॅम शेवग्याच्या पानांमध्ये ४४० मिग्रॅ कॅल्शियमचे प्रमाण आढळते. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि लोहाचे मुबलक प्रमाण आढळते. तुम्ही शेवग्याची पानं आणि कढीपत्ता एकत्र करून याची एक चटणी तयार करू शकता जी आरोग्यासोबतच चवीलाही छान लागते. याचे सेवन आपल्या शरीरासाठी एका औषधासारखे काम करेल. याचे नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरातील हाडे दुप्पट वेगाने वाढत राहतील. यामुळे सांध्यातील वेदना देखील कमी होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.