हिवाळ्यात केसांची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असतं. कारण हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची अधिक शक्यता असते. अनेकदा केसांची काळजी घेऊनही कोंडा होतो. मग अशात केसातला कोंडा कसा स्वच्छ करायचा, हा खूप मोठा प्रश्न असतो. पण आज आम्ही तुम्हाला यावर रामबाण उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कोरफड हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. कोरफडचा हेअर पॅक जर तुम्ही केसांवर ट्राय केला तर त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल.