सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं जड झाल्यासारखं वाटत? 'हे' उपाय करून मिळवा डोके दुखीपासून आराम
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं दुखणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. अपुऱ्या झोपेमुळे किंवा शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे सामान्यपणे डोकं दुखीची समस्या उद्भवू लागते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू शकतात. नीट झोप न लागणे, वारंवार जाग येणे किंवा झोपेत श्वास रोखला जाणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे कायमच डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. याला स्लीप ॲपनिया असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे कायमच शांत आणि शरीरास आवश्यक असलेली झोप घेणे गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांवर तणाव येतो आणि काळेपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोणत्या कारणामुळे डोकं जड होत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता! ‘टिप्स’ जे वाचवतील आयुष्य
रात्रीच्या वेळी झोपताना सगळ्यांचं उंच उशी घेऊन झोपण्याची सवय असते. पण उंच उशी घेतल्यामुळे मानेवर तणाव येतो. याचा परिणाम डोक्याच्या नसांवर होतो. त्यामुळे झोपताना कायमच हलकीशी उशी घेऊन झोपावे. उंच उशी घेऊन झोपल्यामुळे डोक्यावर तणाव येतो आणि डोकेदुखी होते.
रात्री झोपण्याआधी जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे लवकर झोप येत नाही. यामुळे सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची समस्या उद्भवते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता डोके दुखी होण्याचे महत्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
रात्रभर मोबाइल किंवा कॉम्प्युटर वापरल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. याशिवाय डोळ्यांभोवती काळेपणा वाढतो. डोळ्यांवर आलेल्या तणावांमुळे कायमच डोके दुखीची समस्या उद्भवते.
अनेकांना झोपेमध्ये दात चावण्याची सवय असते. जबड्यावर जोर देऊन चावल्यामुळे संपूर्ण डोक्याच्या नसांवर तणाव येण्याची जास्त शक्यता असते. पोटात जंत झाल्यानंतर प्रामुख्याने ही स्थिती उद्भवते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताचे औषध घ्यावे. शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय वारंवार डोकं दुखीची समस्या उद्भवते.
डोके दुखीची समस्या कमी करण्यासाठी पुरेशी शांत झोप घेणे आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय चहा कॉफीचे जास्त सेवन करू नये. शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. दैनंदिन वापरात मोबाईल किंवा लॅपटॉपचा कमीत कमी वापर करावा. पण वारंवार सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
चुकूनही पिऊ नका ‘या’ फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान, आतड्यांना पोहचेल हानी
सकाळच्या डोकेदुखीची कारणे?
दिवसभर पुरेसे पाणी न पिणे हे डोकेदुखीचे एक सामान्य कारण आहे, जे विशेषतः मायग्रेनमध्ये आढळते.झोपेमध्ये दात घासणे (ब्रक्सिझम) यामुळे जबडा आणि डोक्याच्या स्नायूंवर ताण येऊन सकाळी डोके दुखू शकते.
डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय?
डॉक्टरच्या सल्ल्याने ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधे घेऊ शकता, पण जास्त प्रमाणात घेऊ नका.ध्यान, योग आणि खोल श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि ताण कमी होतो.