फोटो सौजन्य - Social Media
पहिल्याच्या काळी एकदा Commitment दिली की खेळ संपला. ‘आयुष्यभर मी तुझा आणि तू माझी’ असा काही एक प्रकारे खेळ चालायचा. पण जसजसे दशके पलटत गेले. तसतसे नात्याचे नवे स्वरूपही येत गेले. आजकाल Relationship मध्ये येणे अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. अगदी आठवी-नववीचे मुलेही आयुष्यभर सोबत राहण्याच्या गोष्टी करतात. Relationship मध्ये नवनवीन प्रकार आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.
कमिटेड रिलेशनशिप
हा अतिशय सामान्य प्रकार आहे. एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचे वाचन देऊन या नात्याला सुरुवात केली जाते. या नात्याला पुढे जाऊन यश मिळतो. या नात्यात प्रेम फार असते कारण कशीही परिस्थिती असो एकमेकांची साथ न सोडता सर्व जिंकणे प्रत्येकाला जमत नाही. नात्यात यश तेव्हाच होतो जेव्हा प्रेम जास्त असते. या नात्यात Seriousness फार असतो.
डेटिंग
एकमेकांना समजण्यासाठी आणि पुढील आयुष्यभर चर्चा करण्यासाठी बहुतेक कपल्स एकमेकांना डेट करतात. यामध्ये रोमांस असतो, गप्पा असतात पण कमिटमेंट नसते. त्यामुळे याला नाते म्हणता येणे कठीण आहे, कारण नाते असावे की नसावे याचा निर्णय या टप्प्यात घेतला जातो.
Casual रिलेशनशिप
Casual रिलेशनशिपमध्ये गांभीर्य नसते. पण भविष्यात गांभीर्य येण्याच्या अनेक शक्यता असतात. हे नाते पुढे जाऊन पक्के होऊ शकतो. या नात्यात पूर्णपणे भावनांचा खेळ असतो. दोघांना प्रेम आहे, दोघांना एकमेकांची सवय आहे, दोघांच्या भावना एकमेकांशी जोडल्या आहेत, पण दोघांमध्ये कमिटमेंट नाही आहे.
Situationship
Casual Relationship सारखाच हा प्रकार असतो. सगळं काही सारखं घडत असतं. पण दोघांना या नात्याला काही नाव द्यायचे नसते. तसेच दोघांना एकमेकानांपासून दूरही जायचे नसते. प्रेम असतं पण कबूल करायचे नसते. अशा नात्यांना Situationship म्हणतात. Gen Z मध्ये असे नाते दिसून येते.
Casual Sex
फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हे नाते असते. या नात्यात काहीच प्रेम नसते. जोडप्यांच्या भावना जोडलेल्या नसतात. फक्त शारीरिक सुख मिळवण्यासाठी दोघे नात्यात असतात.
एथिकल नॉन मोनोगेमी
या नात्यात मुलगा आणि मुलगी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात. अशा प्रकारच्या नात्यात दोघेही पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परस्पर संमतीने इतर लोकांसोबतही रोमँटिक आणि शारीरिक संबंध ठेवू शकतात. यामध्ये कोणतीही कमिटमेंट नसते आणि दोघांची संमती असते.






