Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, किडनी खराब होऊन कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2025 | 02:07 PM
सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • किडनी निकामी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे?
  • किडनीच्या कार्यात कशामुळे अडथळे निर्माण होतात?
  • कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे किडनीचे कार्य बिघडते?
किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. यासोबतच रक्त शुद्ध करणे हे महत्वपूर्ण काम किडनी करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला गंभीर हानी पोहचते. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्तातील घाण शरीरात तशीच साचून राहते. यामुळे शरीरात अनेक बदल होतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. किडनी निकामी किंवा खराब झाल्यानंतर प्रामुख्याने सकाळच्या वेळी लक्षणे दिसून येतात. सकाळी दिसणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर सकाळच्या वेळी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल साफ

किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे:

सकाळी थकवा आणि कमजोरी:

सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला कायमच थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. किडनीमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते आणि थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर प्रामुख्याने सकाळच्या वेळी शरीरात थकवा जाणवतो.

लघवीमध्ये बदल दिसून येणे:

किडनी खराब झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे लघवीत फेस येणे. लघवीमध्ये वाढलेल्या वेदना, लघवीमध्ये सतत होणारी जळजळ, फेस इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. किडनी खराब झाल्यानंतर लघवीचा रंग खूप जास्त गडद होऊन जातो. याशिवाय काहीवेळा लघवी करताना खूप जास्त वेदना होतात.

खूप जास्त तहान लागणे:

वारंवार लघवीला होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे खूप जास्त तहान लागते. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्यानंतर वारंवार लघवीला होणे, वारंवार तहान लागणेइत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. तसेच सकाळी झोपेतून उठल्यानंतर पोटात सूज किंवा मुरडा येऊन पोटात वेदना वाढू लागतात. किडनी खराब झाल्यानंतर डोळ्याखाली सूज, चेहरा फुललेला किंवा पायांमध्ये सूज येऊन शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

त्वचेवर खाज येणे:

शरीरातील विषारी घटक किडनीमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे, रॅश येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. शरीरात जमा झालेल्या विषारी घटकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर दिसू लागतो. त्वचेमध्ये वाढलेल्या खाजेमुळे काहीवेळा जखमा होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर प्रामुख्याने चेहऱ्यावर खाज येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do not ignore these symptoms that appear in the body after waking up in the morning kidney problem symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney Transplant

संबंधित बातम्या

RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या,  मरणाच्या दारातून परतला आरजे सुमित; सांगितला आजारपणाचा धक्कादायक प्रसंग
1

RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परतला आरजे सुमित; सांगितला आजारपणाचा धक्कादायक प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.