फोटो सौजन्य - Social Media
फ्लर्टींग करणे चुकीचे नाही. पण कधी कधी फ्लर्टींग चुकीच्या पद्धतीने केल्याने फ्लर्टींग चुकीची वाटते. फ्लर्टींगला ही एक पद्धत असली पाहिजे. आजकालच्या मित्र मैत्रिणींमध्ये तसेच मुला मुलींमध्ये फ्लर्टींग मोठ्या प्रमाणावर चालते. पण याला काही मर्यादा असणेही तितकेच गरजेचे. नाही तर नाते तयार होण्याअगोदर कोसळून जाईल आणि याला कारणीभूत तुमची पद्धतहीन फ्लर्टींग असेल. चला तर मग जाणून घेऊयात त्या चुकांबद्दल, ज्या फ्लर्टींग करताना टाळल्या पाहिजेत.
फ्लर्ट तुमच्या इमेजलाही खराब करू शकते आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनाही दुखावू शकते. त्यामुळे शब्द वापरताना जपून वापरा. फ्लर्टींग करताना मर्यादा बाळगा. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या फ्लर्टींगपासून त्रास होत असेल तर एक पाऊल मागे घेणे गरजेचे असते अन्यथा नाते विस्कळते. फ्लर्टींग नंतर करा आधी समोरच्याचा सम्मान करा. त्या व्यक्तीला कळू द्या की तुम्ही स्वभावाने जरूर फ्लर्टी असाल पण तुमच्यात देखील त्या व्यक्तीसाठी सम्मान ठासून भरला आहे.
फ्लर्टींग तेव्हाच करा जेव्हा समोरच्याला काही अडचण नसेल. अडचण असेल तर स्वतःला थांबवा. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही फ्लर्ट करत असाल त्याला ठेच पोहचवू नका. त्याला अडचण असेल तर जास्त करू नका. समोरील व्यक्तीच्या संकेतांचा अंदाजा घ्या आणि काम सुरु ठेवा. कधीही ओव्हर करू नका. जर समोरील व्यक्तीच्या मनात जागा करायची आहे तर तुम्ही खरे राहा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला दाखवा. तुमचा खरा स्वभावच तुम्हाला तुमचे प्रेम मिळवून देईल. फ्लर्टींगच्या नादात ओव्हर करू नका.
फ्लर्टींग करून करून किती करणार? फ्लर्टींग अशी करा ज्याने समोरच्या व्यक्तीच्या भावनांना ठेच नाही तर हसू मिळेल. फ्लर्टींग करताना समोरच्या व्यक्तीला हसवण्याचा प्रयत्न करा. कुणाला हसवण्यात काही गैर नसते. जर तुम्ही एखाद्याच्या हसण्याचे कारण बनत गेलात तर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या भाग पण आरामात बनाल. पण हसवता हसवता स्वतःला जोकर बनून नका ठेवू. फ्लर्टींगला मर्यादा असतात, स्वतःचा खरा स्वभाव पण दाखवा. जर समोरील व्यक्तीशी तुम्हाला आयुष्य घालवायचे असेल तर त्याला तुमची खरी बाजू कळूद्या. तुम्ही आयुष्यभर त्या व्यक्तीशी फ्लर्ट नाही करणार आहात तर खरी बाजूची जाणीव करून देणे गरजेचे आहे.
फ्लर्टींग करताना स्वतःला Confident ठेवा. कधी कधी फ्लर्टींगसाठी शब्दांची गरज नसते. एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहणे ही देखील एक प्रकारचा फ्लर्ट आहे. फ्लर्ट करताना खरे कौतुक करा. तुमच्या कौतुकांमध्ये आणि तुमच्यामध्ये खरेपणा जाणवून द्या.






