इडली पात्राचा वापर करून उन्हाळ्यात बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत पापड
उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळीकडे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. त्यात पापड, कुरडया, फेणी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. जेवणात सोबतीला जर पापड असेल तर चार घास जास्त जातात. याशिवाय अनेकांना रोजच्या जेवणात पापड किंवा कुरडया लागतात. मात्र कुरडया बनवण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यामुळे अनेक लोक कुरडया बनवणे टाळतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला इडलीच्या भांड्याचा वापर करून साबुदाण्याचे कुरकुरीत पापड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. साबुदाणा पापड चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पापड बनवू शकता. साबुदाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याशिवाय साबुदाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात थंडगार काकडीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट काकडीची भाजी, उपवासालाही चालेलं भाजी






