पावसाळा म्हटले की सर्वात अडचण होते ती कपडे वाळवण्याची. अशावेळी बाहेरच्या चिखलामुळे कपडे खाराब होणे टाळता येत नाही आणि हवेतल्या आद्रतेमुळे वाळतही नाहीत. विशेषतः शहरांमध्ये असलेल्या छोट्या जागेमुळे कपडे वाळवायला जास्त अडचण येते. परिणामी कपड्यांना दुर्गाधी येणे, बुरशी येण्यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरा आणि पावसाळा अधिक आनंददायी बनवा.






