अंजीर खाण्याचे फायदे
अंजीर हे एक अतिशय चविष्ट फळ आहे जे पिकलेले आणि ड्राय अशा दोन्ही प्रकारात खाऊ शकता. अंजीरमध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. जर तुम्ही अंजीर नियमितपणे खाल्ले तर शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळतात.
जर तुम्ही दिवसातून 2 ते 3 अंजीर खाल्ले तर ते पुरेसे होईल. पोटदुखी, किडनी स्टोन, यकृताचे आजार आणि मायग्रेनने त्रस्त असलेल्या रुग्णांनी हे फळ टाळावे हे लक्षात ठेवा. चला जाणून घेऊया आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्याकडून सुके अंजीर खाण्याचे काय फायदे आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
डायबिटीससाठी फायदेशीर
डायबिटीसच्या रुग्णांसाठी होणारे फायदे
तुम्ही 2 औंस वाळलेल्या अंजीर घेतल्यास त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 60 च्या आसपास असेल. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक मॉडरेट फूड ठरते. या फळामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आढळते, हे असे संयुग आहे जे टाइप-2 मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ग्लुकोज चयापचय वाढवते. जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हेदेखील वाचा – 5 आजारांचा कट्टर शत्रू अंजीर, दिवसातून किती खायला हवेत शरीर राहील मजूबत
वजन नियंत्रित राहील
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी वाळलेले अंजीर खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्यामध्ये असलेले आहारातील फायबर पोट भरून काढण्यास मदत करते, जे भूक कमी करते आणि जास्त खाण्यापासून तुम्हाला दूर ठेवते
रोगप्रतिकारशक्ती वाढेल
अंजीरामुळे वाढेल रोगप्रतिकारकशक्ती
बदलत्या ऋतूमध्ये आपण अनेकदा अनेक आजारांना बळी पडतो, ज्याचे कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तरच तुम्ही हंगामी ताप, सर्दी, खोकला, सर्दी टाळू शकाल. अनेक आहारतज्ज्ञ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुके अंजीर खाण्याची शिफारस करतात कारण त्यात व्हिटामिन सी आणि झिंकसारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात
हेदेखील वाचा – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित खा १ अंजीर, जाणून घ्या फायदे
कसे खावे
अंजीराचा कसा करावा उपयोग
रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही 2-3 सुके अंजीर खाऊ शकता. काही आहारतज्ज्ञ भिजवलेले अंजीर खाण्याचाही सल्ला देतात. तुम्ही दोन्ही पद्धतीने अंजीर खाल्ले तरीही तुम्हाला आरोग्याला फायदाच मिळणार आहे. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित तुम्ही अंजीर खाऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.