वारंवार लघवीला होत असल्यास कोणते घरगुती उपाय करावे
राज्यभरात सगळीकडे कडाक्याची थंडी चालू झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पौष्टिक आहार, व्यायाम इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. शिवाय इतर अनेक आजार वाढू लागतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. सर्वच ऋतूंमध्ये महिलांना वारंवार लघवीला होण्याची समस्या उद्भवू लागते. यामुळे अनेकदा झोप येत नाही, ज्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पण अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे हेच छोटे छोटे आजार मोठे होण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात अल्कोहोल आणि कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन आणि गर्भधारणेदरम्यान या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर किंवा वेळी वारंवार लघवीला होते. सुरुवातील या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण यामुळे UTI संसर्ग, योनिमार्गाची समस्या, किडनी स्टोन, हार्मोनल बदल, मधुमेह, तणाव किंवा चिंता इत्यादी समस्या समस्या असू शकतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वारंवार लघवीला होत असल्यास कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास लवकर आराम मिळेल.
आरोग्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे उष्णता कमी होऊन शरीरात थंडावा निर्माण होईल. वारंवार लघवीला होत असल्यास आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे आराम मिळेल.
आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन केले जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेथी दाण्यांमध्ये आढळून येणारे बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स, वारंवार लघवीला होण्याच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास लवकर आराम मिळेल.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डाळिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढू लागते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. डाळिंबाच्या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म मूत्रमार्गातील संक्रमण नष्ट होतात. शिवाय यामध्ये असलेले बॅक्टेरियल गुणधर्मन आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.