आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस 2024
मागील काही दिवसांपासून देशभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले जात आहे. काही दिवसांआधी पुण्यातील एका पबमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले. तसेच तिघांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस साजरा केला जात आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे 26 जून ला अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि ड्रग्स दुरुपयोग रोखण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.
7 सप्टेंबर 1987 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अंमली पदार्थांपासून मुक्त मिळवण्यासाठी ठराव मांडला होता. त्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. 26 जून 1989 मध्ये सगळ्यात आधी अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. ड्रग्सचे सेवन केल्याने त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. जे आरोग्यासाठी घातक आहे. अतिप्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक वेगवेगळ्या आजारांचा धोका निर्माण होतो.
भारतासह इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने लोकांना क्षणिक आनंद मिळतो, पण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.अफूपासून तयार करण्यात आलेल्या हेरॉईन, मफिन इत्यादी अनेक ड्रग्सचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. ही सर्व ड्रग्स आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. हल्लीची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे सेवन करत आहे. अतिप्रमाणात ड्रग्स घेतल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य- Istock)