Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 दिवसात 5 किलो वजन कमी करतील 5 व्यायाम, व्हाल आश्चर्यचकीत; तज्ज्ञांनी सांगितले सत्य

तुम्हालाही पोटावरील वाढलेल्या चरबीचा त्रास होतो का? चांगली गोष्ट अशी आहे की काही सोप्या पण प्रभावी व्यायामांनी तुम्ही फक्त ७ दिवसांत सुमारे ५ किलो वजन कमी करू शकता, कसे ते जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 28, 2025 | 10:47 AM
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे (फोटो सौजन्य - iStock)

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करणे जितके कठीण आहे तितकेच महत्त्वाचे आहे, विशेषतः जेव्हा पोटाच्या चरबीचा प्रश्न येतो. दिवसभर निरोगी आहाराचे पालन करणे आणि YouTube वरून व्हायरल वर्कआउट्स करणे हे अगदी सामान्य झाले आहे, परंतु तरीही परिणाम अपेक्षेपेक्षा कमी असतात. मात्र असे काही व्यायाम आहेत जे आपल्याला योग्य परिणाम मिळवून देतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. 

डॉ. सुरेंद्र कुमार, एमबीबीएस, जनरल फिजिशियन, नवी दिल्ली यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादू कामी येत नाही, परंतु काही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्यायाम आहेत जे तुम्ही नियमितपणे केले तर तुम्हाला फक्त ७ दिवसांत फरक दिसून येतो. पोटाभोवती जमा झालेली चरबी काढून टाकणे सोपे नाही, परंतु योग्य तंत्र, योग्य स्थिती आणि थोडे कठोर परिश्रम करून तुम्ही तुमचे ध्येय जलद साध्य करू शकता.

या लेखात, आम्ही अशा 5 सोप्या पण प्रभावी वर्कआउट्सबद्दल सांगितले आहे, जे फिटनेस तज्ज्ञांनी सुचवले आहेत. हे केवळ पोटाची चरबी कमी करत नाहीत तर संपूर्ण शरीराला योग्य टोनदेखील मिळवून देतात. म्हणून जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर आजच हे व्यायाम सुरू करा! (फोटो सौजन्य: iStock)

माऊंटन क्लायंबर्स

कोअर स्ट्रेंथ वाढविण्यासाठी उत्तम

माउंटन क्लाइंबर्स हा एक असा व्यायाम आहे जो तुमच्या कोर, अ‍ॅब्स आणि कार्डिओ फिटनेसवर एकाच वेळी काम करतो. यामध्ये तुम्ही पुशअप पोझिशनमध्ये यावे लागते आणि तुमचे गुडघे वेगाने पुढे-मागे हलवावे, तुम्ही डोंगर चढत आहात अशी हालचाल करावी लागते त्यामुळे याला माऊंटन क्लांयबर्स म्हणतात. साधारण ३० ते ४० सेकंदांच्या सेटने सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा. या वर्कआउटमुळे पोटाची चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीराची सहनशक्तीदेखील वाढते. दररोज ३-४ सेट केल्याने खूप फरक पडेल.

थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!

बर्पीज 

एक व्यायाम आणि फायदे अनेक

बर्पींजला ‘फुल बॉडी वर्कआउट’ म्हणतात कारण हा व्यायाम एकाचवेळी अनेक स्नायूंना लक्ष्य करते. या व्यायामात उडी मारणे, स्क्वॅट करणे आणि पुशअप्सचे एकत्रित संयोजन असते, जे हृदयाची गती त्वरीत वाढवते आणि चयापचय वाढवते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये दररोज १५ ते २० बर्पीज करणे पुरेसे आहे. हळूहळू या व्यायामाची संख्या वाढवा. हा व्यायाम केवळ पोटाची चरबी कमी करत नाही तर शरीराला अधिक उर्जा मिळवून देतो. जर तुम्हाला जलद वजन कमी करायचे असेल तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बर्पीजचा समावेश नक्कीच करा.

हाय नी रनिंग

त्वरीत फॅट्स कमी करण्यासाठी

हाय नी रनिंग, म्हणजेच धावताना गुडघे छातीवर आणणे, हा एक उत्तम चरबी जाळणारा व्यायाम आहे. हा व्यायाम कार्डिओ वर्कआउटप्रमाणे काम करतो आणि चयापचय त्वरित सक्रिय करतो. दिवसातून दोनदा १-१ मिनिटे हाय नी रनिंग केल्याने पोटाची चरबी लवकर वितळते. मंद गतीने सुरुवात करा आणि नंतर वेग वाढवा. या व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते आणि संपूर्ण शरीरात ऊर्जा प्रसारित होते.

स्क्वाट्स 

लोअर बॉडी आणि पोट दोन्ही कमी करण्यासाठी उपयुक्त

स्क्वॅट्स हा व्यायाम बहुतेकदा फक्त मांड्या आणि नितंबांसाठी चांगले मानला जातो, परंतु जर ते योग्यरित्या केले तर ते पोटाची चरबीदेखील वेगाने कमी होऊ शकते. स्क्वॅट्स केल्याने शरीरातील मोठे स्नायू गट सक्रिय होतात, ज्यामुळे कॅलरी बर्निंगचा वेग वाढतो. दररोज २०-२५ स्क्वॅट्सने सुरुवात करा आणि हळूहळू वेग वाढवा. लक्षात ठेवा की स्क्वॅट्स करताना तुमची पाठ सरळ असावी आणि गुडघे पायांच्या रेषेत असावेत. यामुळे स्नायूंवर योग्य दबाव येईल आणि दुखापतीचा धोका कमी होईल.

2025 मध्ये 5 कामं करणं कधीच सोडू नका, वेट लॉस करणं होईल सोपं; पोट-मांडीवरील थुलथुलीत चरबी येईल संपुष्टात

प्लँक

स्टॅबिलिटी आणि स्ट्रेंथचे समीकरण

प्लँक हा एक व्यायाम आहे जो जास्त हालचाल न करता खोल स्नायूंवर काम करतो. पोट, कंबर आणि गाभा घट्ट करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. सुरुवातीला प्लँक २०-३० सेकंद धरून ठेवा आणि हळूहळू १ मिनिटापर्यंत करा. लक्षात ठेवा की प्लँक करताना शरीर सरळ असावे आणि कंबर एका रेषेत असावी. यामुळे गाभ्याची ताकद वाढेल आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी वेगाने कमी होईल. दररोज प्लँक केल्याने दीर्घकाळात चांगले परिणाम मिळतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Experts shared how to lose 5 kilos in 7 days with 5 easy exercise weight loss tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • belly fat excercise
  • exercises
  • Health Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
1

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
2

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
4

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.