वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ खावेत
वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर लठ्ठपणा वाढू लागतो. तसेच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, जंक फूड, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर वजन वाढण्यास सुरुवात होते. काहींना सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. तेलकट आणि पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरातील विषारी पदार्थ तसेच शरीरात साचून राहतात, ज्यामुळे अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. कंबर, हात आणि पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. हात आणि पोटावर वाढलेल्या चरबीमुळे पोटाचा घेर जास्त दिसू लागतो.
पोटावर अतिरिक्त चरबी वाढू लागल्यानंतर आहारात चीझ किंवा पनीरपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. अन्यथा शरीरात आणखीन चरबी वाढू लागते. पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे चरबीचे प्रमाण वाढू लागते. लठ्ठपणा आणि वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या वाढून हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार होऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:यंदाच्या दिवाळीत पाहुण्याच्या घरी भेट म्हणून घेऊन जा अक्रोड खजुराची शुगर फ्री बर्फी
शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मदत करते. तसेच कोमट पाण्यात मध किंवा लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातील. जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. कोमट पाण्यात तुम्ही आलं मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यसाठी मदत करतात. गॅस, अपचन, असिडिटीपासून आराम मिळतो.
वजन वाढल्यानंतर शरीराच्या हालचाली कमी होऊन जातात. सतत बाहेरचे पदार्थ आणि अतिखाण्याच्या सवयीमुळे वजन वाढते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागते. त्यामुळे कोमट पाण्यात तुम्ही आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर टाकून पिऊ शकता. आवळ्याची पावडर बाजारात सहज उपलब्ध होते. विटामिन सी युक्त आवळा शरीरातील चरबीच्या पेशी कमी करण्याचे काम करतो. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवून चयापचय क्रिया वाढते.
हे देखील वाचा:शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन
दुधीच्या रसाचे नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होऊन शरीर स्लिम होईल. दुधीचा रस कमी फायबरयुक्त आहेत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसेच सकाळच्या नाश्त्यात दुधी रस प्यायल्यास लवकर भूक लागत नाही आणि पोटही दीर्घकाळ भरलेले राहते. पण दुधीचा रस बनवताना दुधी चांगला आहे की नाही हे तपासून पाहावे.