वजन कमी करण्याची जपानी पद्धत (फोटो सौजन्य - iStock)
वाईट खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पोट आणि कंबरेवर चरबी साचल्याचा त्रास दिसून आहे. जर तुम्हालाही वाढत्या वजनाची चिंता असेल आणि कोणत्याही कठोर आहाराशिवाय तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर जपानी खाण्याच्या सवयी अंगीकारणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
जपानमधील लोक त्यांच्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. जपानमधील लोक सर्वात तंदुरुस्त आहेत आणि दीर्घकाळ निरोगी राहतात. त्याच्या आहारात अनेक नैसर्गिक आणि आरोग्यदायी गोष्टींचा समावेश आहे ज्यामुळे त्याला केवळ पोटाची चरबी कमी करण्यास मदत होत नाही तर दीर्घकालीन आरोग्य फायदे देखील मिळतात. Blue Zones ने दिलेल्या अभ्यासानुसार हारा हाचिबू हे वेट लॉससाठी उत्तम जपानी टेक्निक आहे. याचा कसा वापर करावा हे आपण या लेखातून जाणून घेऊया
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
वजन कमी करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे
हारा हाचिबू, आंबवलेले पदार्थ, कमी कॅलरीयुक्त पदार्थ यासारख्या जपानी तंत्रांमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हालाही कठोर व्यायाम आणि डाएटिंगशिवाय स्लिम आणि फिट राहायचे असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत जपानी खाण्याच्या सवयींचा समावेश करा. जपानी लोकांच्या पाच सर्वोत्तम खाण्याच्या सवयी जाणून घेऊया ज्यामुळे ते नेहमीच तंदुरुस्त आणि सडपातळ राहतात.
काय आहे हारा हाचिबू टेक्निक
ही एक जपानी संकल्पना आहे ज्याचा अर्थ ८०% पर्यंत खाणे. भूक लागल्यानंतर संपूर्ण पोट न भरता केवळ ८० टक्केपर्यंत अन्न खाणे अशी ही पद्धत आहे. जपानमधील लोक कधीही जास्त जेवत नाहीत. जपानी लोक हारा हाचिबू तंत्राचा अवलंब करतात, म्हणजेच ते त्यांच्या मेंदूला ८०% अन्न खाल्ल्यानंतर खाणे थांबवण्याचे प्रशिक्षण देतात. यामुळे ते जास्त खाणे टाळू शकतात आणि त्यांचे चयापचय चांगले राहते. जर तुम्ही हारा हाचिबू जपानी तंत्राचा अवलंब केला तर तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहील आणि तुमचे वजन नेहमीच नियंत्रणात राहील, लठ्ठपणाची समस्या तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
हळूहळू आणि कमी प्रमाणात खाणे
अन्न नेहमी हळूवार आणि व्यवस्थित चाऊन खावे
जपानी लोक त्यांचे अन्न खूप आरामात, हळूहळू आणि कमी प्रमाणात खातात; याला जाणीवपूर्वक खाण्याकडे लक्ष देणे असेही म्हणता येईल. हळूहळू अन्न खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते आणि तुम्हाला लवकरच पोट भरल्यासारखे वाटू लागते. जेव्हा तुम्ही अन्न हळूहळू आणि एका वेळी कमी प्रमाणाता खाता तेव्हा चयापचय सुधारते आणि शरीरात चरबी जमा होण्याचा धोका कमी होतो. या जपानी सवयीचा अवलंब करून, तुमच्या पोटाची आणि कंबरेची चरबी झपाट्याने कमी करू शकता.
लो कॅलरी आणि संतुलित आहार
संतुलित आहाराची गरज
जपानी लोक त्यांच्या आहारात कमी कॅलरीज आणि संतुलित आहाराचा समतोल राखतात. जपानला ब्लू झोनमधील व्यक्ती म्हटले जाते आणि हे ब्लू झोनमधील व्यक्ती जास्त तळलेले, जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खात नाहीत; तर त्याऐवजी, त्याच्या आहारात मासे, भाज्या, समुद्री शैवाल आणि निरोगी कार्बोहायड्रेट्सचा समावेश असतो. जपानी आहारात भाताची भूमिका महत्त्वाची असते, पण जपानी व्यक्ती भात तळून न खाता उकडून खातात. याशिवाय, जपानी लोक गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थदेखील टाळतात. जर तुमच्या आहारातून गोड पदार्थ काढून टाकले तर वजन वाढण्याची समस्या कमी होते.
फर्मेंटेड पदार्थांचे सेवन
फर्मेंटेड पदार्थांचे योग्य सेवन
नाट्टो, किमची, दही इत्यादी आंबवलेले पदार्थ जपानी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि आपली पचनक्रिया मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगले पचन झाल्यास तुमचे चयापचय वेगाने वाढते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया सुधारते. जर तुम्हाला पोट आणि कंबरेची चरबी लवकर कमी करायची असेल, तर तुमच्या दैनंदिन आहारात आंबवलेले पदार्थ समाविष्ट करून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील.
ताजे आणि नैसर्गिक पदार्थ
नैसर्गिक आणि ताज्या पदार्थांचे नियमित सेवन करावे
जपानमधील लोक शक्य तितके प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर राहतात आणि नेहमीच ताजे आणि नैसर्गिक पदार्थ खाणे त्यांना आवडते. जपानी आहारात ग्रीन टी, उकडलेल्या भाज्या, ताजी फळे आणि मासे यासारख्या आरोग्यदायी गोष्टींचा समावेश असतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जपानी लोक लाल मांसापेक्षा समुद्री खाद्य आणि मासे खाणे पसंत करतात कारण त्यात प्रथिने जास्त आणि चरबी कमी असते. हे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि शरीरावर चरबीही वाढत नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.