पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक्स प्यावे (फोटो सौजन्य - iStock)
आजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणे ही केवळ एक स्टाईल नाही, तर ती एक गरज बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंगपासून ते व्यायामापर्यंत प्रत्येक पद्धती वापरून पाहतात. पण एक गोष्ट जी लोक अनेकदा विसरतात ती म्हणजे सकाळची सुरुवात. रिसर्चमधून असे दिसून आले आहे की जर दिवसाची सुरुवात योग्य पेयांनी झाली तर वजन कमी करणे खूप सोपे होऊ शकते.
काही खास नैसर्गिक पेये आहेत जी केवळ चयापचय वाढवतातच असे नाही तर शरीरात साठलेली चरबी हळूहळू वितळण्यासदेखील मदत करतात. कोमट लिंबू पाणी, मेथी पाणी, ओव्याचे पाणी, ब्लॅक कॉफी आणि दालचिनी-मधाचे पाणी हे सर्व असे पर्याय आहेत जे चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. सतत सेवन केल्याने फरक स्पष्टपणे दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याचा खर्च जास्त नाही आणि घरातच या वस्तू आपल्याला मिळतात आणि पूर्णपणे नैसर्गिक असतात. म्हणून जर तुम्हाला ताण न घेता वजन कमी करायचे असेल तर ही पाच पेये तुमच्या सकाळच्या दिनचर्येचा भाग करून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
लिंबाचे कोमट पाणी
कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे
कोमट पाण्यात लिंबू मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने चयापचय सक्रिय होते. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते. तसेच, हे पेय पचनसंस्था सुधारते. या पाण्यात चिमूटभर दालचिनी किंवा थोडे मध घातले तर त्याचा प्रभाव अधिक चांगला ठरतो. लिंबू पाण्याचा हा सोपा आणि स्वस्त उपाय केवळ चरबी वितळवत नाही तर दिवसभर ऊर्जादेखील टिकवून ठेवतो.
थुलथुलीत पोट आणि लटकलेली चरबी कमी करून करा वेट लॉस, जपानी ट्रिक्स वापरून बघा जादू!
ब्लॅक कॉफीचा पर्याय
ब्लॅक कॉफी ठरेल उत्तम
ब्लॅक कॉफी ही नैसर्गिक चरबी जाळणारी असल्याचे म्हटले जाते. त्यात असलेले कॅफिन शरीराची ऊर्जा वाढवते आणि चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करते. सकाळी एक कप ब्लॅक कॉफी साखरेशिवाय प्यायल्याने तुम्हाला सक्रिय वाटेल आणि तुमचे चयापचयदेखील वेगवान होईल. मात्र ही ब्लॅक कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन करायची आहे हे लक्षात ठेवा. दिवसातून एक किंवा दोन कपपेक्षा जास्त ब्लॅक कॉफी पिऊ नका. योग्यरित्या सेवन केल्यास तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात एक प्रभावी पेय ठरू शकते.
ओव्याचे पाणी ठरेल फायदेशीर
ओव्याच्या पाण्याचा करा वापर
ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो पाचक रसांचा स्राव वाढवतो. याचा अर्थ असा की ओव्याचे पाणी केवळ पचन सुधारत नाही तर शरीरातील चरबी साठत असेल तर त्यावर परिणाम करते. सकाळी रिकाम्यापोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पोटाची चरबी आणि पोट फुगणे कमी होते. तुम्हाला हवे असल्यास, चव वाढवण्यासाठी आणि फायदे वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबू किंवा मध घालू शकता.
मेथीचे पाणी
मेथीचे पाणीही ठरेल उपयुक्त
रात्रभर भिजवून ठेवलेली मेथी उकळून सकाळी त्याचे पाणी प्यायल्याने चरबीचे चयापचय वाढते. मेथीमध्ये आढळणारे फायबर पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करते, यामुळे तुम्ही अतिरिक्त खाणे बंद करता. त्यात अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्मदेखील आहेत जे पचन सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. विशेष म्हणजे मेथीचे पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी विशेषतः प्रभावी मानले जाते.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
दालचिनी आणि मधाचे ड्रिंक
दालचिनी पावडर आणि मध मिक्स करून प्यावे
दालचिनी आणि मध यांचे मिश्रण केवळ चविष्ट नाही तर वजन कमी करण्यातही आश्चर्यकारक मदत करते. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि मधातील एंजाइम चरबी लवकर वितळवते. अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा शुद्ध मध एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. हे पेय शरीराला डिटॉक्स करते, चयापचय वाढवते आणि दीर्घकाळ वजन कमी करण्यास मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.