शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत
सतत थकवा कशामुळे जाणवतो?
रक्त वाढवण्यासाठी काय खावे?
रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. यासोबतच शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत असणे सुद्धा फार आवश्यक आहे. बऱ्याचदा विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. कोणतेही काम करताना कमजोरी आल्यासारखे वाटते तर काहीवेळा अचानक कोणत्याही क्षणी डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येते. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष न तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. शरीरात कोणताही बिघाड झाल्यानंतर वारंवार शरीरात लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा कशामुळे जाणवतो, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
तुमच्या शरीरात नेहमीच थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर अॅनीमियाची लक्षणे असू शकतात. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा वाढून शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते. तसेच इतर आजरांमुळे सुद्धा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. अॅनीमिया झाल्यानंतर थकवा, अशक्तपणासोबतच चा पिवळी पडणे किंवा श्वास भरून येणे, सतत चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तर काहीवेळा रक्ताची पातळी प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे हात पाय खूप जास्त थंड पडतात.
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. नियमित बीट किंवा बीटचा रस प्यावा. तसेच डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे रक्त भरून निघते. थकवा अशक्तपणा कमी करण्यासाठी गाजर आणि बीटचा रस प्यावा. याशिवाय नियमित २ किंवा ३ खजूर खावे. यामुळे पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढते. आयुर्वेदानुसार रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास गूळ आणि चणे खाण्याचा सल्ला दिला जातो. महिनाभर नियमित गूळ आणि चणे खाल्ल्यास रक्त वाढेल आणि थकवा कमी होईल.
रक्त वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नियमित एक डाळिंब खावे. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामीन सी, के व्यतिरिक्त आयर्न मोठ्या प्रमाणावर आढळून येते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच रोजच्या आहारात फळे, भाज्या, पालेभाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शेवग्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते.






