वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? 'या' पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी
देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. या दिवसांमध्ये शरीरसोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीत केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे आणि केसांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे केस पांढरे सुद्धा होतात. केस कोरडे झाल्यानंतर ते पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आणि परदेशी ब्रँडच्या हेअर केअर प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण यामुळे काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केसांच्या समस्या उद्भवून केसांना हानी पोहचते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता या टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
थंड हवामानामुळे आपल्या केसांमधील ओलावा कमी होऊ लागतो. परिणामी केसांमध्ये कोंडा होणे, केस दुभंगणे आणि केस कोरडे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यासाठी बदलत्या हवामानानुसार आपल्या केसांची योग्य ती देखभाल करणं आवश्यक आहे. कोरडेपणामुळे केसांचे अधिक नुकसान होते. केसगळती, कोंडा होणे, टाळूला खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये केसांची कशी काळजी घ्यावी, जाणून घेऊया.
हीट आणि हेअर स्टाइलिंग टुलचा नियमित वापर करणं टाळावं. अन्यथा केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. मुख्यतः थंड वातावरणात केसांचे नुकसान अधिक होतं. हिवाळ्यात स्टाइलिंग टुलचा अति वापर केल्याने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो. जे केसांचे आरोग्यासाठी हानिकारक असते.
ठराविक दिवसांच्या अंतरानंतर केस कापणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होणार नाहीत. वेळच्या वेळी केस कापणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हेअर केअर रुटीनमधील हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
केवळ थंडीच्या दिवसांतच नव्हे तर नियमित स्वरुपात केसांना सीरम लावावे. सीरमच्या वापरामुळे केस कोरडे होत नाहीत. केसांमधील ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे केस मऊ आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. दुभंगलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सीरमचा वापर करावा.
हिवाळ्यामध्ये टाळूच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. यामुळे टाळूची त्वचा कोरडी होऊ लागते. टाळूची त्वचा निरोगी असेल तर केसांशी संबंधित समस्या उद्भवत नाही, ही बाब लक्षात ठेवा. कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी टाळू हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. केमिकल फ्री शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा. केसांच्या मुळांना कंडिशनर लावण्याची चूक कधीही करू नका.
एक आवश्यक हेअर केअर रुटीन आहे. नियमित स्वरुपात केसांना तेल लावून हलक्या हातानं मसाज करावा. सध्या बाजारामध्ये आपल्या केसांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध आहेत.






