Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?

Hair Straightening or smoothing which is best: हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूथनिंग या दोन्ही ट्रीटमेंट्स केसांना आकर्षक आणि स्टायलिश लूक देण्यासाठी लोकप्रिय आहेत. मात्र त्यांच्या प्रक्रियेत आणि केसांवरील परिणामांमध्ये फरक असल्याने योग्य ट्रीटमेंट निवडणे महत्त्वाचे ठरते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 07:44 PM
Hair Care Tips:  हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?
Follow Us
Follow Us:
  • हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक?
  • केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?
  • ट्रीटमेंटपूर्वी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे
आजकाल सॉफ्ट, सिल्की आणि स्टायलिश केसांसाठी अनेक महिला विविध हेअर ट्रीटमेंट्सचा वापर करत आहेत. विशेषतः हेअर स्ट्रेटनिंग आणि हेअर स्मूथनिंग या दोन ट्रीटमेंट्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. मात्र अनेकांना या दोन्ही प्रक्रियांमध्ये नेमका काय फरक आहे, हे माहित नसते. त्यामुळे कोणती ट्रीटमेंट आपल्या केसांसाठी योग्य ठरेल, याबाबत संभ्रम निर्माण होतो. ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, या दोन्ही ट्रीटमेंट्सचा उद्देश केस अधिक सॉफ्ट अन् सिल्की दिसणे हा असला तरी त्यांची प्रक्रिया, परिणाम आणि केसांवरील प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक आहे, जाणून घेऊयात.

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध

हेअर स्ट्रेटनिंग म्हणजे काय?

हेअर स्ट्रेटनिंग ही प्रक्रिया केस पूर्णपणे सरळ करण्यासाठी केली जाते. या ट्रीटमेंटमध्ये केमिकल्स आणि हीटचा वापर करून केसांचा नैसर्गिक टेक्स्चर बदलला जातो. कुरळे किंवा वेव्ही केस पूर्णपणे स्ट्रेट आणि शायनी दिसू लागतात. स्ट्रेटनिंगचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. मात्र या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे काही वेळा केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात.

हेअर स्मूथनिंग कसे वेगळे आहे?

हेअर स्मूथनिंगमध्ये केसांचा नॅचरल लूक कायम ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे केस सॉफ्ट, सिल्की आणि कमी फ्रिझी दिसतात. स्मूथनिंगमध्ये स्ट्रेटनिंगच्या तुलनेत कमी केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे केसांचे नुकसान कमी होते. नैसर्गिक आणि सॉफ्ट लूक हवा असल्यास स्मूथनिंग हा अधिक चांगला पर्याय मानला जातो.

कोणता पर्याय निवडावा?

तज्ज्ञांच्या मते, ज्यांना पूर्णपणे सरळ केस हवे आहेत त्यांनी स्ट्रेटनिंगचा पर्याय निवडू शकतात. मात्र नैसर्गिक लूक, कमी नुकसान आणि सॉफ्ट टेक्स्चर हवे असल्यास स्मूथनिंग अधिक योग्य ठरते. केसांचा प्रकार, गुणवत्ता आणि स्काल्पची स्थिती लक्षात घेऊनच ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे.

ट्रीटमेंटपूर्वी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे

तज्ज्ञांच्या मते, हेअर स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. काही लोकांना वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे अॅलर्जी, खाज किंवा स्काल्पवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट करण्यापूर्वी अनुभवी हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणे आणि केसांची स्थिती तपासणे अत्यंत गरजेचे मानले जाते.

ट्रीटमेंटनंतर घ्यायची काळजी

  • सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा.
  • वारंवार हीट स्टायलिंग टाळा.
  • नियमित हेअर स्पा करा.
  • केसांना योग्य मॉइश्चर द्या.
  • तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Relationship Tips: रागाच्या भरातही जोडीदाराला बोलू नका ‘या’ गोष्टी; नातं तुटू शकतं

Web Title: Hair straightening vs smoothing difference benefits care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • hair care tips in marathi
  • Long Hair

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण
2

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
4

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.