सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्याने पोट भरलेले राहते. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर मोड आलेली कडधान्य खातात. यामुळे वजन होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर कडधान्य खाल्ल्याने शरीराला फायदे होतात. शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते. कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यावेळी मोड आलेले कडधान्य खाऊ शकता.
मूग मटकी तुम्ही उकडून किंवा मीठ टाकून खाऊ शकता. यामुळे शरीराला फायदे होतील.मोड आलेली कडधान्य तुम्ही सँडविच किंव सॅलड बनवून खाऊ शकता. यामुळे तुम्हला ताजेतवाने आणि निरोगी वाटेल. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर, पोटॅशियम, विटामिन सी, विटामिन बी, कॉपर यांसारखे पोषक घटक यामध्ये आढळून येतात. सकाळच्या नाश्यावेळी कडधान्य खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.मोड आलेली कडधान्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता.आज आम्ही तुम्हाला मोड आलेल्या मूगाचे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: istock)
[read_also content=”कोकणातील चवदार फळ चुकीच्या पद्धतीने खाणं तरुणाला भोवलं, चेहरा हाथ जळला, खाण्याची योग्य पद्धत आणि फळाविषयी जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/eating-konkans-delicious-fruit-wrongly-eats-young-man-burns-his-face-and-hands-know-the-right-way-to-eat-and-know-the-fruit-540953.html”]
मोड आलेली कडधान्य खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
पचनक्रिया सुधारते:
पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कडधान्यांचे सेवन करावे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना पचनक्रिया किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशांनी आहारात मूग किंवा इतर कडधान्य खाल्ली पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते:
बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवणे आवश्यक आहे. कडधान्यांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते.
वजन कमी करण्यास उपयुक्त:
वाढत्या वजनाच्या समस्येने अनेकजण हैराण झाले आहे. कितीही जीम केली किंवा इतर काही व्यायाम केले तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. त्यामुळे आहारात मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते:
मधुमेहाचा त्रास असलेले किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून शरीरसंबंधित इतर समस्या उध्दभवत नाहीत. कडधान्यांमध्ये असलेले फायबर हृद्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
[read_also content=”गणपतीची भूक शमवणारे हे पान, घरात सुख-शांती आणते, जाणून घ्या लावण्याची योग्य पद्धत https://www.navarashtra.com/lifestyle/lets-know-the-benefits-of-planting-basil-at-home-540996.html”]
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर:
कडधान्यांमध्ये विटामिन ए, विटामिन सी, सिलिका असल्याने केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. बदलत्या हवामानामुळे टॅन झालेली त्वचा उजळ्वण्यास मदत होते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कडधान्यांमध्ये अनेक गुणकारी घटक आढळतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात कडधान्यांचे सेवन करावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






