जेवण बनवताना आपल्याकडून अनेकदा जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी अनेक चुका होतात. मात्र जेवण बनवताना केलेल्या काही चुका तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकतात. त्या चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम (Health Risk) होऊ शकतो. अनेक जण भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा (Iron Kadhai) वापर करतात. मात्र लोखंडाच्या कढईत पुढील 6 गोष्टींचा समावेश असलेले पदार्थ चुकूनही बनवू नका.
टोमॅटो (Tomato)
टोमॅटो मुलत: ॲसिडिक असतो. ज्यावेळी लोखंडाच्या कढईत टोमॅटो टाकून काही बनवलं जातं त्यावेळी लोखंडासोबत त्याची प्रक्रिया होते. त्यामुळे धातूसारखी चव जेवणाला येऊ शकते. त्यामुळे टोमॅटोपासून बनवले जाणारे पदार्थ नॉन रिॲक्टीव्ह कुकिंग पॉटमध्ये बनवायला हवे.
चिंच (Tamarind)
टोमॅटोप्रमाणे चिंचही ॲसिडिक आहे. ज्यावेळी तुम्ही चिंच टाकून लोखंडाच्या भांड्यात काही बनवता तेव्हा पदार्थाचा रंग बदलतो. धातुसारखी चव लागते. चिंच असलेले पदार्थ बनवण्यासाठी ॲल्युमिनियमची भांडी किंवा मातीची भांडी वापरायला हवी.
पालक (Spinach)
पालकमध्ये ऑक्सालिक ॲसिड असल्याने पालक असलेला पदार्थ लोखंडाच्या कढईत केल्याने पालकाचा मूळ रंग बदलतो आणि हिरव्याऐवजी काळा रंग त्याला प्राप्त होतो. पालकमधील ऑक्सालिक ॲसिड आणि आयर्न या दोन्हीच्या रिॲक्शनमुळे पालकाचा रंग बदलतो.
लिंबू (Lemon)
लिंबूदेखील ॲसिडिक आहे. जेव्हा लिंबाचा रस लोखंडाच्या कढईत तयार होत असलेल्या भाजीत टाकला जातो, तेव्हा भाजीची चव कडू होते. त्यामुळे लोखंडाच्या कढईत लिंबाचा वापर होणारा पदार्थ बनवू नये.
बीट (Beetroot)
बीटमध्ये आर्यनचं प्रमाण जास्त असतं. जेव्हा लोखंडी कढईत बीटपासून एखादा पदार्थ बनवला जातो तेव्हा बीटची रिॲक्शन होऊन जेवणाचा रंग बदलतो.
कढी आणि रस्सम (Curry Or Rassam)
लोखंडी कढईत कढी किंवा रस्सम बनवू नये. ॲसिडिक पदार्थांसोबत आयर्नची रिॲक्शन जेवणाची चव खराब करते.






