हत्तीरोग नियंत्रणाबाबत जिल्हा टास्क फोर्स (फोटो- istockphoto)
जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत उपाययोजना
जनजागृती व विस्तृत सादरीकरण
नागरिकांना आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन
सिंधुदूर्ग: जिल्हयात हतीरोगाच्या आढळेला रुग्णानुसार नमुने तपासले असता. त्यामध्ये १०१ नमुने माय करो फायलेरिया रुग्ण सापडले याबधीत रुग्णांवर १२ दिवस उपचार केले गेले. यासह विविध आजाराचा आढावा घेतला. हत्तीरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजनां बाबत जिल्हा टास्कफोर्सची सभा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अध्यक्षतेखाली झाली. यांच्या माकडताप व हत्तीरोग आजाराच्या अनुषंगाने जिल्हा टास्क फोर्सची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती.
सदर सभेमध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश करतस्कर यांनी विस्तृत सादरीकरण केले. माहे. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यांमध्ये माकड तापाचे रुग्ण आढळून येतात. यावर्षी अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मागील वर्षी या आजाराचे चार रुग्ण आढळून आले होते. या अनुषंगाने जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, जनजागृती याबाबत विस्तृत सादरीकरण केले. सदरचा आजार हा सर्वप्रथम माकडांना होऊन माकड मृत होते. सदर माकडाच्या अंगावर असलेल्या दूषित गोचिडी मार्फत या आजाराचा प्रसार माणसांमध्ये होतो.
बाधित भागातील बागायती, शेती मधून नागरिकांनी घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे गरजेचे आहे. दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील यापूर्वी माकडताप आढळल्या गावांमध्ये घरोघरी या आजाराबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहितीपत्रक देखील आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत वाटण्यात आलेले असून जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा यांची प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी नागरिकांनी वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन केले. निवासी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्हा प्रशासनाने यावषा एकहा माकड ताप रुग्ण आढळणार नाहा याकरिता आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम
हत्तीरोगाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. हे सर्व रुग्ण विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार या भागातून कामासाठी आलेले असून त्यांचे ५८८४ रक्त नमुने तपासणी केली असता १०१ रक्त नमुन्यामध्ये मायक्रो फायलेरिया ने बाधित आढळलेले आहेत. त्या सर्व रुग्णांना १२ दिवसांचा समूळ उपचार व सहवासित मजूरांना १ दिवसाचा समूळ औषधोपचार करण्यात आलेला आहे अशी माहिती देण्यात आली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






