Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण

Excess salt Side effects: चवीसाठी जास्त मीठ खाण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. दररोजच्या आहारात जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्यावर कोणता परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 19, 2026 | 06:35 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • जास्त मीठ खाणे ठरू शकते धोकादायक
  • रोज किती मीठ खावे?
  • जास्त मीठ खाल्ल्याने कोणते धोके वाढतात?
अन्नाची चव वाढवण्यासाठी मीठ हा अत्यावश्यक घटक आहे. मात्र, चव वाढवण्याच्या नादात अनेकजण गरजेपेक्षा जास्त मीठ खातात. शरीराच्या योग्य कार्यासाठी सोडियम आवश्यक असले तरी त्याचे अतिसेवन केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार आणि इतर गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दररोज किती मीठ घ्यावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी की रात्री? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या आरोग्यदायी पर्याय

दररोज किती मीठ खाणे योग्य?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) प्रौढ व्यक्तीने दिवसाला 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ म्हणजेच साधारण एक चमचा मीठ सेवन करावे. यामध्ये स्वयंपाकात वापरलेले तसेच पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील मीठही समाविष्ट असते.

जास्त मीठ खाल्ल्याने कोणते धोके वाढतात?

गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीवर अतिरिक्त ताण येण्याचा धोका वाढतो. काही लोकांमध्ये शरीरात पाणी साचणे, सूज येणे आणि दीर्घकाळात रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

जास्त मीठ खाल्ल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

अति प्रमाणात मीठ खाल्ल्यानंतर काहींना सतत तहान लागणे, शरीरात सूज येणे, चेहरा किंवा पाय फुगल्यासारखे वाटणे, डोकेदुखी, थकवा आणि रक्तदाब वाढल्याची समस्या जाणवू शकते. अशी लक्षणे वारंवार दिसत असल्यास मिठाचे सेवन कमी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हिडन मीठ ओळखा

फक्त वरून मीठ घातल्यामुळेच सोडियम वाढत नाही. पॅकेज्ड स्नॅक्स, चिप्स, लोणची, पापड, इंस्टंट नूडल्स, सॉस, बिस्किटे आणि फास्ट फूडमध्येही मोठ्या प्रमाणात मीठ असते. त्यामुळे जंक फूड किंवा फास्ट फूड पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

मीठाचे सेवन कमी करण्यासाठी उपाय

  • स्वयंपाकात मीठ मोजून वापरा.
  • पॅकेज्ड पदार्थांवरील सोडियमचे प्रमाण वाचा.
  • ताज्या फळे, भाज्या आणि घरगुती अन्नाला प्राधान्य द्या.
  • चव वाढवण्यासाठी लिंबू, कोथिंबीर, आले, लसूण आणि इतर नैसर्गिक मसाल्यांचा वापर करा.
  • हळूहळू मीठ कमी केल्यास जिभेलाही त्याची सवय लागते.

कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी?

उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मिठाच्या सेवनाबाबत अधिक सतर्क राहावे. तसेच आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दररोज ब्रेड-बिस्किट खाताय? मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी किती घातक, जाणून घ्या

Web Title: Health tips how much salt should you eat daily side effects of excess salt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • food
  • healthy food
  • street food

संबंधित बातम्या

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी
1

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
2

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

Vegetable Storage Tips: कोणत्या फळभाज्या फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत? जाणून घ्या ही गरजेची गोष्ट
3

Vegetable Storage Tips: कोणत्या फळभाज्या फ्रीज मध्ये ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नयेत? जाणून घ्या ही गरजेची गोष्ट

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
4

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.