पिस्ता खाण्याचे फायदे
पिस्ता हे एक ड्रायफ्रूट असून याचा वापर मिठाई बनवण्यासाठी किंवा इतर गोड पदार्थांमध्ये टाकण्यासाठी केला जातो. चवीला खारट असलेल्या पिस्त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे फळ पिस्ताशिया वेरा नावाच्या झाडाचे बीज फळ आहे. ड्राय फ्रुटमधील हा पदार्थ किंमतीने महाग असला तरीसुद्धा अनेक लोक रोजच्या आहारात पिस्त्याचे सेवन करतात. पिस्त्यांपासून तेल आणि बटर तयार केले जाते. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, फोलेट, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, विटामिन बी 6, तांबे आणि फॉस्फरससारखी अनेक खनिजे आढळून येतात.
पिस्त्याचे सेवन केल्याने शरीराला योग्य ते पोषण मिळते. मिठाईच्या अनेक पदार्थांमध्ये पिस्त्याचा वापर केला जातो. तर घरी गोड पदार्थ बनवल्यानंतर त्यामध्ये पिस्त्याचे तुकडे टाकले जातात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पिस्ता खाल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला पिस्ता खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
पिस्त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी गुणकारी आहेत. एका पिस्त्यामध्ये सुमारे 0.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 0.12 ग्रॅम निरोगी चरबी, 0.15 ग्रॅम प्रथिने आणि सुमारे 4 कॅलरीज असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय यामध्ये टिऑक्सिडंट्स आणि विटामिन ई असते ज्यामुळे पेशींचे होणारे नुकसान टाळता येते.
हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण निरोगी जीवनशैली जगण्यासाठी योग्य तो आहार घेणे आवश्यक आहे. पिस्त्यामध्ये आढळणारे विटामिन ई हे हृदयाच्या पेशींचे रक्षण करतात. शिवाय यामध्ये मॅग्नेशियम असते जे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक लोक हैराण झाले आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या वाढत जातात. पिस्त्यामध्ये नैसर्गिक ऊर्जा, प्रथिने आणि फायबर असते, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पिस्ता उपयुक्त आहे. यामध्ये असलेले विटामिन ई आणि इतर अनेक पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण करून संसर्गांपासून वाचता येते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.