Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयविकार आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही, तज्ञांनी दिला गंभीर इशारा

मेटाबॉलिक आजार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाशी संबंधित मानला जात होता, मात्र आता तो 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही आढळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 06:40 PM
(फोटो सौजन्य-Gemini)

(फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढतंय
  • जीवनशैलीत बदल केल्यास हा धोका टाळता येतो
  • महत्त्वाचे आरोग्य निर्देशक तपासत रहा
Heart disease is no longer limited to the Elderly : आजच्या काळात निष्क्रिय जीवनशैली, वाढता ताण आणि लवकर सुरू होणारे मेटाबॉलिक आजार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हृदयविकार हा वृद्धापकाळाशी संबंधित मानला जात होता, मात्र आता तो 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही आढळत आहे तेही अनेकदा कोणतीही पूर्वलक्षणे न दिसता. चांगली गोष्ट म्हणजे योग्य वेळी जीवनशैलीत बदल केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो.  याबाबत अधिक माहिती BDR Pharmaceuticals चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. Aravind Badiger यांनी दिली.

Sonam Kapoor दुसऱ्यांदा झाली आई; Reliance Hospitalचे आणि डॉक्टरांचे मानले आभार

हृदयासाठी योग्य आहाराला प्राधान्य द्या

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोसेस्ड फूड, ट्रान्स फॅट, मीठ आणि साखर यांचे सेवन कमी करा. त्याऐवजी संपूर्ण धान्ये, फळे, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ तसेच सुकामेवा आणि बिया यांचा आहारात समावेश करा. यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि वजन नियंत्रणात राहते.

नियमित शारीरिक हालचाल ठेवा

नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत होते आणि रक्ताभिसरण सुधारते. आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यात जलद चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यांचा समावेश होऊ शकतो. त्याचा फायदा शरीर तंदुरुस्त राहायला होतो.

ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन

ताण हा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे, जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. जास्त ताणामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि जास्त खाणे किंवा धूम्रपान यांसारख्या वाईट सवयी लागू शकतात. त्या वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी ताणतणावाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे.

महत्त्वाचे आरोग्य निर्देशक तपासत रहा

विशेषतः ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे अशा तरुणांनी नियमित हेल्थ चेकअप करणे आवश्यक आहे. रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल यांचे वेळोवेळी परीक्षण केल्यास गंभीर आजार टाळता येतात. त्यामुळे वेळोवेळी योग्य आरोग्याची तपासणी केली तर या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.
थकवा, छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास किंवा चक्कर येणे ही लक्षणे हलक्यात घेऊ नयेत. तरुणांमध्ये ही लक्षणे अनेकदा दुर्लक्षित होतात, परंतु योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.

वजन नियंत्रणात ठेवा

स्थूलता ही उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकारांसाठी मोठा जोखीम घटक आहे. योग्य आहार आणि व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

पुरेशी झोप घ्या आणि वाईट सवयी टाळा

झोपेची कमतरता आणि धूम्रपान किंवा मद्यपान यांसारख्या सवयी हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. दररोज 7-8 तासांची चांगली झोप घेणे आणि अशा सवयी टाळणे गरजेचे आहे.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

Web Title: Heart disease is no longer limited to the elderly experts have issued a serious warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • daily health
  • health care news
  • health issue
  • healthy heart
  • heart attack
  • heart attack awareness
  • Heart Disease
  • heart problems
  • HeartAttack

संबंधित बातम्या

जागतिक हृदय दिनानिमित्त Lilavati Hospital कडून मोफत हृदय आरोग्य शिबीर! 1500 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी
1

जागतिक हृदय दिनानिमित्त Lilavati Hospital कडून मोफत हृदय आरोग्य शिबीर! 1500 हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Epilepsy Treatment In India : देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच
4

Epilepsy Treatment In India : देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.