तरुण त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपाय
महिलांच्या शरीरात बदल दिसू लागल्यानंतर सगळ्यात आधी त्वचेमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, बारीक रेषा येणं, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेचे हळूहळू नुकसान होऊ लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेवर बारीक रेषा दिसू लागल्यानंतर चेहऱ्याचे सौदंर्य हळूहळू कमी होऊ लागते. चेहऱ्यावर आलेल्या या सुरकुत्या घालवण्यासाठी फेसमास्क, क्रिम, फेशिअलकरणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण याचा ग्लो फारकाळ चेहऱ्यावर टिकून राहत नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा खराब होते तर उन्हाळ्यात टॅनिंग मुळे त्वचा खराब होऊ लागते. खराब झालेला त्वचेचा रंग आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. चिकट झालेली त्वचा स्वच्छ केली नाहीतर पुन्हा एकदा चेहऱ्यावर पिंपल्स आणि बारीक रेषा दिसू लागतात. स्ट्रेस आल्यानंतरसुद्धा चेहऱ्यावर बारीक रेषा दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेची योग्यता काळजी घेऊन त्वचेचे आरोग्य स्वच्छ ठेवले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल.
हे देखील वाचा:गणेशोत्सवात ५ मिनिटांमध्ये चेहऱ्यावर आणा काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने करा साखरेचा वापर
तरुण त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपाय:
सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सगळ्यात आधी दीर्घ श्वास द्या. त्यानंतर 10 मिनिटं श्वास थांबवून ठेवा. असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे स्नायू आकसून जातील. त्यानंतर हळूहळू श्वास घेऊन चेहरा सामान्य स्थितीमध्ये आणा. असे पाच ते सहा वेळा केल्यानंतर चेहऱ्यावर थोडासा फरक दिसून येईल. चेहऱ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही हा उपाय नियमित केल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल.
हे देखील वाचा: चष्म्यापासून मिळणार कायमचा सुटकारा; या जादूच्या ड्रॉप्सने सुधारणार दृष्टी
चेहऱ्याचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर योगासने करावीत. हा एक योगासनांचा प्रकार असून चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यास मदत करतो. त्वचेला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यानंतर त्वचा आणखीन चमकदार आणि सुंदर दिसते. फेसयोग केल्यामुळे त्वचेच्या सर्व समस्या नाहीशा होतात आणि त्वचा तरुण दिसते.