कपाळावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावणे, तर कधी ब्रँडेड क्रीम्स लावल्या जातात. मात्र अनेकदा हे उपाय करूनसुद्धा त्वचा डाग विरहित होत नाही. महिलांच्या शरीरात सातत्याने होत असलेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आहारात बदल करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. वातावरणात होणारा बदल, शरीरातील हार्मोनल बदल, जास्त सूर्यप्रकाश आणि मेलेनिनचे प्रमाण वाढल्यानंतर त्वचा काळी दिसू लागते. मान, कपाळ आणि चेहऱ्यावर काळे डाग येण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शॅम्पूत ही जादुई गोष्ट मिसळा आणि कमाल बघा, केसगळती थांबेल, टक्कलवर उगवतील नवे केस
चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला काहींना काही उपाय करत असतात. काळे डाग घालवण्यासाठी महागड्या आणि केमिकल युक्त ट्रीटमेंट करून घेतात. ट्रीटमेंट केल्यानंतर त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसू लागते. मात्र काही दिवसानानंतर पुन्हा एकदा त्वचेवर काळे डाग येण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला कपाळावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल.
कपाळ आणि त्वचेवर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी कच्चे दूध अतिशय प्रभावी आहे. कच्च्या दुधात असलेले गुणधर्म डाग घालवण्यासाठी मदत करतात. शिवाय यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. वाटीमध्ये दूध घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करा. तयार मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण त्वचेला लावून हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटं ठेवून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास काळेपणा कमी होऊन त्वचा उठावदार आणि सुंदर दिसेल.
वाटीमध्ये बदाम तेल घेऊन त्यात दुधाची पावडर आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण त्वचेला लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. चेहरा कोरडा होण्यासाठी 10 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल. बदामाच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे झिंक सेबमचे उत्पादन नियंत्रित राहते, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम येत नाहीत.
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासह रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या
काकडीचे सेवन केल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. त्वचेवरील काळेपणा घालवण्यासाठी काकडीची पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. काहीवेळ मसाज करून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे काळेपणा दूर होईल. काकडी लावल्यामुळे त्वचा स्वच्छ होईल.






