• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Air Pollution Affects Your Skin Take Timely Steps Says Experts

वायू प्रदूषणाचा तुमच्‍या त्‍वचेवर कशाप्रकारे परिणाम होतो, वेळीच उचला पावले

Skin Tips: सतत बदलत असणाऱ्या वातावरणामुळे त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होताना दिसतो. यासाठी डर्मेटोलॉजिस्ट त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देतात. वायू प्रदूषणाचा नक्की काय परिणाम होतोय जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 15, 2024 | 06:23 PM
वायू प्रदू,णामुळे त्वचेवर होणारा परिणाम

वायू प्रदू,णामुळे त्वचेवर होणारा परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्‍या महिन्‍यात मान्‍सून परतण्‍यासह ऑक्‍टोबर हीट सुरू झाली, जेथे वातावरणीय बदलामुळे मुंबईतील प्रदूषणामध्‍ये मोठी वाढ झाली. शहराचा एअर क्‍वॉलिटी इंडेक्‍स (एक्‍यूआय) खूप खालावला आणि शहरातील निवासींना अनेक आरोग्‍यविषयक आजारांचा सामना करावा लागला.  आमच्‍या निदर्शनास आले की, दररोज जवळपास ४० ते ६० टक्‍के बाह्यरूग्‍ण (ओपीडी) वायू प्रदूषणामुळे त्‍वचेवर झालेल्‍या परिणामांवरील उपचारासाठी आले होते आणि बहुतांश केसेसमध्‍ये ऑक्‍टोबरच्‍या पहिल्‍याच आठवड्यात सुरूवातीच्‍या लक्षणांना सुरूवात झाली होती असे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्‍संल्टंट डर्माटोलॉजिस्‍ट व कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजिस्‍ट डॉ. स्‍मृती नस्‍वा सिंग यांनी सांगितले आहे. त्यांनी या लेखातून अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

त्वचेची काळजी 

त्वचेची काळजी घेण्याची गरज

त्वचेची काळजी घेण्याची गरज

त्‍वचा शरीराच्‍या पृष्‍ठभागावरील अवयव आहे आणि वातावरणातील धोकादायक घटकांपासून संरक्षण करते. तसेच, त्‍वचेमधून उत्‍सर्जन देखील होते आणि सतत बाहेरील वातावरणाच्‍या संपर्कात असते. याच कारणामुळे हवामानातील बदल, कीटक, परागकण, डास, एलर्जीन्‍स, प्रदूषित हवेतील कण, यांचा त्‍वचेवर परिणाम होतो. हवेतील प्रदूषके ‘एन्डोक्राइन डिरप्‍टर्स’ म्‍हणून काम करतात, ज्‍यामुळे आपल्‍या सिस्‍टम्‍समधील हार्मोनलचा नाश होतो.

सुरूवातीला मुरमं, कोंडा, पुरळ अशी लक्षणे दिसून येतात आणि दीर्घकाळापर्यंत हार्मोनल असंतुलन, वंध्‍यत्‍व, पॉलिसायस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) व कर्करोग असे आजार होऊ शकतात. तसेच, प्रदूषित हवेमध्‍ये फ्रेश ऑक्सिजनच्‍या कमतरतेमुळे त्‍वचेच्‍या बाह्य भागावर परिणाम होतो. बहुतांश रूग्‍ण खाली देण्‍यात आलेल्‍या त्‍वचासंबंधित समस्‍यांबाबत तक्रार करत आहेत आणि या सर्वांसाठी कारणीभूत घटक वायू प्रदूषणामध्‍ये वाढ असू शकतो.   

त्वचेसंबंधित काळजी घेण्यासाठी काय करावे जाणून घ्या करा क्लिक 

काय होतो परिणाम 

प्रदूषमामुळे चेहऱ्यावर होणारा परिणाम

प्रदूषमामुळे चेहऱ्यावर होणारा परिणाम

  • पित्ताच्‍या गाठी/अर्टिकेरिया – त्‍वचेच्‍या एलर्जीचे लक्षण. एलर्जी असलेल्‍या व्‍यक्‍तींना अधिक त्रास होऊ शकतो, कारण हवामान बदलामुळे एलर्जीमध्‍ये वाढ होते. यंदा पित्ताच्‍या गाठी येण्‍याच्‍या केसेसमध्‍ये वाढ झाली
  • एक्झिमा – या स्थितीमध्‍ये शरीराला वारंवार खाज सुटते, ज्‍यामुळे त्‍वचेवर जाड, गडद व पू असलेले चट्टे येतात, ज्‍यामधून खूप खाज सुटते आणि त्‍वचेचा संसर्ग होऊ शकतो. सामान्‍यत: निकेल एलर्जी, दमा, धुळीची एलर्जी आणि सायनस समस्‍या असलेल्‍या व्‍यक्‍तींना याचा त्रास होतो
  • मुरमं – सर्व वयोगटातील व्‍यक्‍तींच्‍या त्‍वचेवर पू असलेली मुरमं येण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाल्‍याचे निदर्शनास आले आहे
  • टाळू व शरीरावर उबाळे (फोड) – टाळू व शरीरावर वेदनादायी संसर्गित उबळ्यांच्‍या केसेस देखील गेल्‍या महिन्‍याभरात वाढल्‍या आहेत
  • संपूर्ण शरीरावर खाज सुटणे – अनेक रूग्‍णांनी संपूर्ण शरीरावर खाज सुटत असल्‍याचे सांगितले. काहींना सतत खाज सुटल्‍याने अस्‍वस्‍थता वाटली, जेथे खाजवल्‍याने रक्‍तस्राव देखील झाला. 

कशी घ्यावी काळजी 

त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करावे

त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करावे

त्‍वचेची योग्‍य काळजी घेणे सर्वात मोठा प्रतिबंध आहे. दररोज खोबरेल तेल, कोरफड जेल, ग्‍लायसेरिन, पॅराफिन, शिया बटर इत्‍यादींसह त्‍वचेला मॉइश्‍चराइज करा, ते हायपोएलर्जिक व असुगंधी असतात. सौम्‍य सल्‍फेट-मुक्‍त साबण किंवा बॉडीवॉशेसचा वापर करा. फळे, भाज्‍या, बाजरी, शेंगा, नट्स व बियांनी संपन्‍न आहाराचे सेवन करा, कारण या घटकांमध्‍ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि आतड्यांना शरीरातील टॉक्झिन्‍स उत्‍सर्जित करण्‍यास मदत करू शकतात.  

त्वचेसंबंधित काळजीसाठी कसे असावे रूटीन वाचा 

कसा करावा प्रतिबंध 

प्रतिबंध करताना काय काळजी घ्यावी, कशी ठेवावी त्वचा

प्रतिबंध करताना काय काळजी घ्यावी, कशी ठेवावी त्वचा

त्‍वचेला खाज सुटण्‍यापासून प्रतिबंध करण्‍यासाठी आसपासच्‍या परिसराची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. घरातील धूळ झाडून न काढता ओल्‍या कपड्याने पुसून काढा. फर्निचर व फर्निशिंग्‍स ओल्‍या कपड्याने पुसा आणि तागाचे कपडे दर दोन ते दिवसांनी धुवा. घरामध्‍ये ताजी कोरफड जेल, स्‍नेक प्‍लांट, स्‍पायडर बांबूची लागवड करा, ते वातावरण स्‍वच्‍छ ठेवण्‍यास मदत करतात. या सूचनांचे पालन केल्‍यास तुमच्‍या त्‍वचेचे प्रदूषणाच्‍या घातक परिणामांपासून संरक्षण होऊ शकते, पण गंभीर त्‍वचेसंबंधित आजार असल्‍यास ते पुरेसे ठरू शकणार नाहीत. वर उल्‍लेख करण्‍यात आलेली लक्षणे किंवा त्‍वचेसंबंधित परिणाम आढळून आल्‍यास त्‍वरित डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

Web Title: How air pollution affects your skin take timely steps says experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 06:23 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Skin Care

संबंधित बातम्या

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
1

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक
2

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
3

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही
4

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.