जागतिक हृदय दिन (World Heart Day) दरवर्षी 29 सप्टेंबला साजरा केला जातो. हृदयाचे आरोग्य जपता यावे असे या दिवसाचे उद्देश आहे. बरेचदा मधुमेह (Diabetic Persons) असणाऱ्या लोकांना आपल्या आरोग्याची नीटशी काळजी घेता येत नाही.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्यांना त्रास होतो. मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजार याचा जवळचा संबंध आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आरोग्य जास्त जपावे लागते. हे दोन्ही आजार गुंतागुंतीचे आहे. मधुमेह (Diabetes) असणाऱ्या व्यक्तीने या आजारावर नियंत्रण ठेण्यासाठी ग्लुकोजच्या पातळीवर नियमितपणे देखरेख ठेवणे आवश्यक आहे. कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणांसारख्या साधनांचा वापर करुन यावर मात करता येते
डॉ. पार्थ सारथी सांगतात की, भारतामध्ये 90 टक्के लोक हे मधुमेहासोबत हृदयाच्या आजाराशी देखील झुंज देत आहेत. या गुंतागुंतीमुळे हृदयावर परिणाम होतो. मधुमेहाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची वाढलेली पातळी यांसारख्या कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका वाढविणाऱ्या घटकांता प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
मधुमेहासोबत हृदयाचे आरोग्य कसे जपाल?
1.रक्तातील साखरेच्या पातळीचं नियंत्रण – Freestyle Libre सारख्या CGM साधनांच्या माध्यमातून रक्तातील साखरेच्या पातळीचा चढउतार तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका नियंत्रणात राहू शकतो
2. हृदयासाठी योग्य आहार – कोलेस्ट्रोलची पातळी वाढविणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळा. बटर, रेड मीट आणि स्निग्धांश पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स सर्रास आढळून येतात तर ट्रान्स फॅट्स हे साधारणपणे तळलेल्या किंवा प्रकियायुक्त पदार्थ वापरले जातात. यामध्ये धान्ये, रंगीत भाज्या, नट्स आणि बियातून मिळणारे हेल्थी फॅट्सचा आहारात समावेश करा
3. नियमित व्यायाम – हृदयरोगाचा धोका कमी करायचा असल्यास व्यायाम करा. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रोलची उच्च पातळी या गोष्टी नियंत्रणात राहणं आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचालीमुळे मधुमेहाचेही चांगले व्यवस्थापन होईल. सायकलिंग करा किंवा चालायला जा.
4. धुम्रपान आणि मद्यपान टाळा – धुम्रपानामुळे तुमच्या रक्तावाहिन्या खराब होता. त्याचा परिणाम मधुमेहामुळे धमन्या अरुंद होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागते. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो.
5. ताणतणाव व्यवस्थापन – आपण तणावग्रस्त असतो तेव्हा तुमचे शरीर स्ट्रेस हार्मोन्स निर्माण करते. रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ करते. त्यातून इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होऊ शकतो. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे हृदयावर ताण येतो. त्यामुळे ताण वाढणार नाही याकडे लक्ष द्या.