नात्यात थोडं-थोडं भांडण होणं सामान्य गोष्ट आहे. पण जर बायको सारखीच रागावत असेल, तर तो विषय थोडा गंभीर होतो. याचा अर्थ असा नाही की नात्यात प्रेम संपलंय. उलट, आता नात्याला समजूतदारपणाने सांभाळण्याची वेळ आहे. जर तुम्हीही विचार करत असाल की “तिला शांत कसं करायचं?”, तर खाली दिलेले काही उपाय तुमच्या उपयोगी ठरतील.
रागावलेल्या बायकोला असे करा शांत. (फोटो सौजन्य - Social Media)
बायको रागात असेल तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. तिला वाटायला हवं की तुम्ही तिच्या भावना समजून घेता. बऱ्याच वेळा रागामागे एखादी न सांगितलेली गोष्ट असते, ती समजून घ्या.
कधी कधी चूक तुमची नसली तरी एक प्रेमाने केलेली माफी नातं वाचवू शकते. ही कमजोरी नाही, तर प्रेम जपण्याची ताकद असते.
जर वातावरण खूप तापलेलं असेल, तर तिला थोडा वेळ एकटी राहू द्या. तुम्हीही थोडं बाहेर फिरून या किंवा एखादं काम करा, दोघांनाही विचार करायला वेळ मिळेल.
छोटे गोड सरप्राइजेस तिचा मूड लगेच सुधारू शकतात. हे दाखवतं की तुम्ही तिच्या भावना जपता आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहात.
जर राग थोडा ओसरला असेल, तर हलकंफुलकं विनोद करा. योग्य वेळ साधली तर तुमचं एक हास्यसुद्धा मोठा भांडण संपवू शकतं. तिला तुमचं खरं प्रेम जाणवू द्या. स्पष्टपणे सांगा की तिचं तुमचं आयुष्यात किती महत्त्व आहे. जेव्हा ती हे समजून घेईल, तेव्हा तिचा राग नक्कीच मावळेल.