फोटो सौजन्य - Social Media
जेव्हा प्रेम असते तेव्हा कंटाळा नसतो. वेळेनुसार कंटाळा येणे ठीक आहे पण नात्याचा कधीच कंटाळा येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या नात्याला सदैव ताजे ठेवायचे असेल तर काही गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून, तुमच्या प्रेयसीला कधीच कंटाळा येणार नाही, उलट ती तुमच्या प्रेमात खोलवर जाईल.
फक्त बोलून होत नाही. नात्यात स्पर्श महत्वाचा असतो. एकमेकांना स्पर्श करण्यात कसलीही हयगय ठेवू नका पण मर्यादाही तितक्याच राखा. किमान एकमेकांना घट्ट मिठी मारत जा. प्रियसीच्या कपाळावर चुंबन घेत जा, या कृतीने तिलाही आपलेपणाची आणि प्रेमाची भावना येईल. प्रियसी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मला गिफ्ट दे. तुम्हालाच स्वतः आणायचे आहे, पण याचा अर्थ असा नाही की तिला महागडे गिफ्ट हवे आहेत. तिला तुमच्या गिफ्टच्या मागे दडलेल्या प्रेमाशी घेणंदेणं आहे. गिफ्ट स्वस्त असो वा महाग, प्रेमाने देणे आणि प्रेमाने घेणे महत्वाचं असतं.
तुम्ही तुमच्या प्रियसीला कृतीतून प्रेम दाखवा. स्वयंपाक करताना तिला मदत करा. तिच्या कामामध्ये तिच्या परवानगीने मदत करा. तिची कामे हलकी करण्यास होतील तितके प्रयत्न करा. मग पहा, तिच्या मनात तुमच्याविषयी वाढलेले प्रेम आणि महत्व! प्रेमात फ्लर्ट करणेही महत्वाचे असते. आता फ्लर्ट कसे करायचे?
अशा प्रकारे करता येईल फ्लर्ट?
प्रियसीशी संवाद साधताना तिच्या डोळ्यांमध्ये पहा. नजरेने नजरेशी खेळा. चेहऱ्यावर हलकीशी स्माईल ठेवा. या कृतीने तिच्या मनात तुमच्याविषयी आकर्षण वाढेल. आकर्षण वाढले तर कृतीनुसार प्रेम वाढवा आणि मुळात तिला जपण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या नशिबी प्रेम येत नाही, तुमच्या नशीबात आहे म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तिच्या काळजीचा आदर करा, ती चिडेल, ती भांडेल पण तिच्यापासून दूर जाऊ नका. ती चिडते याचा अर्थ ती तुम्हाला तिच्या आयुष्यातून हाकलतेय असं नसतं. तिला समजण्याची गरज असते, तीही कधी कधी त्रासात असते. समजुदारपणाचं नात्याला फुलवेल.