आई-वडील नेहमी आपल्या मुलांच्या चांगल्याचा विचार करत असतात. त्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असते. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. मुलांनी वाईट मार्गावर न जात चांगल्या मार्गाचा आधार घ्यावा यासाठी अनेकदा त्यांना कठोर बनावे लागते. म्हणूनच आपले पहिले गुरु आपले आई-वडीलच असतात.
मात्र वाढत्या वयाबरोबरच अनेक मुलं बंडखोर होऊ लागतात. असे विशेषतः मुलाच्या बाबतीत घडून येते. त्याला आपल्या आवडीनुसार आयुष्य जगायचे असते आणि इथूनच मुलाबापाचे कोमल नटे कुठेतरी हरवू लागते. त्यांच्यात दुरावा पडू लागतो. अनेकदा त्यांच्यात मतभेदही होऊ लागतात. मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असताना, वैचारिक मतभेदांमुळे वडिलांसोबतचे नाते अनेकदा ताणले जाते. अशा परिस्थितीत वडील आणि मुलामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो.
लक्षात ठेवा, मुला-बापाच्या नात्यातील वाढती दरी लवकरात लवकर बुजवायला हवी. अंतर आणि मतभेद योग्य वेळी थांबवले पाहिजेत. यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा केला जात आहे. फादर्स डेच्या निमित्ताने वडील आणि मुलाचे नाते घट्ट करण्यासाठी आणि त्यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी आम्ही आज काही सोपे उपाय सुचवत आहोत. यांचे अनुसरण करून लवकरच तुमचे नाते घट्ट होण्यास मदत मिळेल.