संध्याकाळच्या चहासोबत सोप्या पद्धतीमध्ये बनवा आलू कुरकुरे
पावसाळा सुरु झाल्यानंतर काहींना काही चटपटीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. या दिवसांमध्ये गरमागरम चहा आणि कांदाभजी खाल्ली जाते.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त भूक लागते. अशावेळी काहींना काही खाण्याची सतत इच्छा होत असते. नेहमीच बाहेरून आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावे. हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत काहींना काही पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर बटाटा कुरकुरे कसेबनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटाट्यापासून बनवलेले कुरकुरे चवीला तिखट आणि खायला कुरकुरीत असतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यासाठी बनवा दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी