केसांच्या वाढीसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी तयार करा आयुर्वेदिक तेल
सर्वच महिलांना सुंदर, लांबलचक आणि घनदाट केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांना कधी हेअरमास्क लावणे तर कधी केसांना केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात.मात्र बऱ्याचदा केसांमधील पोषण कमी झाल्यानंतर केसांच्या वाढीवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस मुळांपासून तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केस रुक्ष आणि कोरडे झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. बदलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार केले जातात.(फोटो सौजन्य – iStock)
ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल
केस गळतीची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारातील महागडे प्रॉडक्ट लावतात. मात्र केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी आवळा आणि कढीपत्त्याची पाने अतिशय प्रभावी ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरगुती आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून घरगुती तेल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या तेलाचा वापर नियमित केसांसाठी केल्यास केसांची वाढ घनदाट होईल आणि केस सुंदर दिसू लागतील.
नाजूक डोळ्यांखाली चुकूनही लावू नका ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट, डोळ्यांचे होईल कायमचे गंभीर नुकसान
केसांच्या वाढीसाठी बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही तेल लावण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या तेलाचा वापर करावा. आल्याचा तुकडा, कांद्याच्या साली, मेथीचे दाणे इत्यादी पदार्थ केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. या पदार्थांच्या वापरामुळे केसांना पोषण मिळते. केसांची मूळ मजबूत राहतात आणि केस घनदाट सुंदर दिसतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थानी बनवलेल्या तेलाचा वापर करावा.