नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट
सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. अनेक लोक सकाळच्या वेळी घाईगडबडीमुळे नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अनेकदा घरी सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा, इडली किंवा डोसा हेच पदार्थ असतात. पण नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात हेल्दी टेस्टी ब्रोकोली टोस्ट बनवून खाऊ शकता. ब्रोकोली आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात ब्रोकोलीचे सेवन केले जाते. शिवाय यामध्ये कमी कॅलरीज असतात. लहान मुलांना ब्रोकोली खायला आवडत नाही. ब्रोकोली पाहून नाक मुरडतात अशा वेळी तुम्ही ब्रोकोली टोस्ट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा