साहित्य १ वाटी उभे काप करून चिरलेला मुळा २ वाट्या उभे काप करून चिरलेले गाजर २ टीस्पून बडिशेप १ टेबलस्पून मोहरी चवीनुसार मीठ आणि लाल तिखट पाव टीस्पून हळद पाऊण टीस्पून आमचूर पावडर चिमुटभर हिंग आणि ३ टेबलस्पून तेल कृती सगळ्यात आधी गाजराचे आणि मुळ्याचे उभे काप करून घ्या. मसाल्यासाठी बडिशेप आणि मोहरी भाजून घ्या, थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या. फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत आता एका बाऊलमध्ये चिरलेले गाजर, मुळा, बडिशेप- मोहरीचा मसाला, आमचूर पावडर, हिंग, चवीनुसार तिखट मीठ टाकून घ्या. सगळ्यात शेवटी गरम करून थंड केलेलं तेल टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की गाजर- मुळा लोणचं झालं तयार.