दुपारच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी काकडीपासून बनवा चविष्ट सॅलड
उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट आणि थंड राहील अशाच पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात काकडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. काकडीमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवशी काकडीचे सेवन केले जाते. काकडीचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा अतिशय हायड्रेट राहते. त्वचेसंबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात तुम्ही काकडीपासून बनवलेले सॅलड बनवू शकता. सॅलड खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया काकडी सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ
दुपारच्या जेवणात अनेकांना कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी भाज्या कच्च्या खाण्याची सवय असते. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. याशिवाय कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला फायदे होतात. शरीरात निर्माण झालेली लोहाची आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट, काकडी इत्यादी भाज्यांचे सेवन करावे.
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या २० मिनिटांमध्ये बनवा साजूक तुपातला मैसूरपाक