दिवसाची सुरुवात करा स्पेशल पदार्थांने! सकाळच्या नाश्त्यात बनवा थंडगार काकडीचे बनवा चटपटीत सँडविच
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं सुचत नाही. नेहमीच बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही साधा सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मसालेदार किंवा तेलकट तिखट पदार्थ खाल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात किंवा सकाळच्या नाश्त्यात शरीराला सहज पचन होणाऱ्या हलक्या आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटात कायम थंडावा राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये थंडगार काकडीचे सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सँडविच चवीला अतिशय सुंदर लागते आणि सँडविच खाल्यानंतर लवकर भूक लागत नाही. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही काकडी सँडविच खाऊ शकता.जाणून घ्या काकडी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)