उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत
उन्हाळा वाढल्यानंतर उष्णतेमुळे अंगाची काहिली होते. घामाच्या धारांमुळे सर्वच नागरिक त्रस्त होऊन जातात. उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. नारळ पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही पुदिन्याच्या पानांचा सुद्धा रस तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिऊ शकता. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीर थंड करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नियमित पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. उन्हाळ्यात सगळ्यात आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणून पुदिन्याचे सरबत. मात्र बऱ्याचदा पुदिन्याची पाने बाजारत उपलब्ध होत नाही. अशावेळी तुम्ही पुदिन्याच्या पानांची पावडर तयार करून सरबत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पुदिना सरबत बनवताना लागणारे प्रिमिक्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी, अवघ्या काही मिनिटांतच होईल तयार