लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत
जेवणाच्या ताटात जर वांग्यांचे किंवा शिमला मिरचीचे भरीत असेल तर चार घास जेवण जास्त जात. गरमागरम भाकरी आणि चविष्ट वांग्याचे भरीत खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. पण नेहमीच वांगी किंवा शिमला मिरचीचे भरीत खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बंगाली पद्धतीने लसूण भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले भरीत घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील आणि चव सुद्धा भारी लागते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना लसूण खायला आवडत नाही. डाळ किंवा भाजीमधील लसूण बाजूला काढून ठेवली जाते. तर काही लोक लसूण पाहिल्यानंतर नाक मुरडतात. त्यामुळे मुलांना या पद्धतीने लसूण भरीत बनवून खाण्यास द्यावे. यामुळे शरीराला पोषण सुद्धा मिळेल आणि आवश्यक फायदे सुद्धा होतील. चला तर जाणून घेऊया बंगली स्टाईलने लसूण भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं सावजी मटण नेमकं कसं बनतं? ‘ही’ आहे पारंपरिक रेसिपी






