सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट paneer sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
सुट्टीच्या दिवशी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खायचा असतो. इतर दिवशी कामाच्या घाईमध्ये नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर सँडविच बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले पनीर सँडविच चवीला अतिशय भारी लागत. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नाश्त्यात किंवा जेवणात पनीरचा समावेश करावा. पनीर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पनीरपासून बनवलेले सर्वच पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही पनीर सँडविच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






