Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ragi Thalipeeth Recipe: घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ, पोट राहील भरलेले

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचे थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या नाचणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2025 | 10:20 AM
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग टेस्टी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाचणीच्या पिठाचे खमंग टेस्टी थालीपीठ बनवून खाऊ शकता. थालीपीठ बनवण्याची भाजणीच्या पिठाचा वापर केला जातो. पण घरात बऱ्याचदा थालीपीठ भाजणी उपलब्ध नसते. त्यामुळे नाचणीच्या पिठात तुम्ही इतरही वेगवेगळ्या धान्यांचे पीठ मिक्स करू शकता. संपूर्ण शरीरासाठी नाचणी अतिशय गुणकारी ठरते. नाचणीमध्ये असलेले घटक शरीराला कॅल्शियम देतात. याशिवाय रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं थालीपीठ खायला खूप जास्त आवडते. नाचणीच्या पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा- अशक्तपणा कमी होतो. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणीच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची ‘लसूण शेव’ घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • कांदा मीठ
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • हळद
  • तांदळाचे पीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • गरम मसाला
  • तीळ
  • ओवा
  • कोथिंबीर
हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी… गुजराती स्टाईलमध्ये बनवा ‘मसाला मेथी खाखरा’

कृती:

  • नाचणीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा हलकासा नरम झाल्यानंतर त्यात नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, लाल मिरची पावडर जिरे, ओवा, तीळ, आले-लसूण पेस्ट,मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या पिठात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला पिठाचा गोळा करून घ्या.
  • कॉटनच्या रुमाल पाण्यात भिजवून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या. त्यानंतर पाटावर रुमाल टाकून तयार केलेल्या पिठाचा गोळा घेऊन एकसमान थापून घ्या.
  • रुमालासहित थालीपीठ गरम तव्यावर टाकून बाजूने तेल सोडा आणि दोन्ही बाजूने खमंग कुरकुरीत थालीपीठ भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणीचे थालीपीठ. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा आवडेल.

Web Title: How to make ragi thalipeeth at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.